स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बांधिलकी प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर संपन्न

459

गिरीश भोपी, पनवेल / नवी मुंबई

कळंबोली येथे १५ ऑगस्ट २०२१  रोजी बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर संपन्न झाले. एकूण ३५ जणांनी रक्तदान केले. एमजीएम रक्तपेढी, कामोठे यांचे सहकार्य लाभले. शिबीरास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. साईधाम को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी कमिटीचे अध्यक्ष  अविनाश म्हात्रे, खजिनदार  लिकायत अली शेख, सचिव  एन. बी. बागायतकर , समिती सदस्य  अरविंद आंब्रले उपस्थित होते. महाड अतीवृष्टी भूस्खलन मदतकार्य ( शेवते आडरे गाव ) प्रतिष्ठानकडून झाल्यानिमित्त या कमिटिने बांधिलकी प्रतिष्ठानचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, योग्य मार्गदर्शन केले. तसेच राजन लोखंडे, सुदर्शन म्हात्रे, निकीता कासारे यांनी महाड मदतकार्यात मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक   महेंद्र गळवे सर हे बांधिलकीचे रक्तदाते असून ते गेली चार वर्षे न चुकता रक्तदान करुन देशसेवेची नाळ जपत आहेत, कृतज्ञता म्हणून त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबीरास  संतोष बुवा, पत्रकार   गिरीश भोपी,  संजय रावण, निर्धार सामाजिक संस्था यांची उपस्थिती लाभली. पाऊस, वॅकसिनेशन चालू असूनही रक्तदाते आले आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली असे मत उपक्रम नियोजक अनिकेत जगताप यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनादिवशी रक्तदान करुन रक्तदात्यांनी खरंच चांगलं कार्य केलं असे मत आयोजक कोमल माने यांनी व्यक्त केले. रक्तदान शिबीर हा उपक्रम असाच पुढे चालू राहील, गरजवंताना मोफत मदतकार्य प्रतिष्ठानकडून होत राहील असे मत आयोजक सुदर्शन म्हात्रे यांनी व्यक्त केले. शिबीरास बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, उपाध्यक्ष स्वप्नील मुटके, उप सचिव श्वेता भोईर, खजिनदार विशाल कावरे, सक्रीय सदस्य श्रद्धा खांडेकर, गितांजली सावंत, अनिरुद्ध जगताप, राहुल चव्हाण, ऋषीकेश कादगे इ. उपस्थित होते.