कोंढवा प्रतिनिधी,
आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अनेक क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या ‘ती ( महिलांच्या )’च्या हस्ते आज आरतीचे ताट विसावले…नानाविध भूमिका निभावणा-या ‘ती’ने आज गणरायाचरणी सेवा अर्पण केली…स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला नव्याने झळाळी दिली… स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीची नव्याने प्रचिती आली. ‘ शिवसंगम मित्रमंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरती ,पूजाअर्चा करण्यात आली. गेल्या ५ वर्षांपासून रुजवलेल्या समानतेच्या चळवळीला झळाळी मिळत आहे. श्री गणरायाची आरती महिलांच्या हस्ते करुन शिवसंगम मित्र मंडळाने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी प्रत्येक स्त्री चा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला तसेच लेक वाचवा , स्त्री सन्मान आणि स्री शिक्षणाचा जागर देखील मंडळाच्या वतीने करम्यात आला.
यावेळी शिवसंगम मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन कापरे, संस्थापक कवेश शिंदे, निलेश महिंद्रकर, गणेश लोणकर तसेच मंडळाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.