सामाजिक कार्याबद्दल सुभाष नानेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

393

पुणे प्रतिनिधी,

कोरोना संकटाच्या काळात शिवणे-उत्तमनगर-कोंढवे -कोपरे या गावांमध्ये सामाजिक बांधीलकी जपत ऊल्लेखनीय कार्य केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनला  कार्यक्षम सरपंच सुभाषभाऊ नाणेकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याबद्दल राज्यपाल कोशारी यांनी विशेष कौतुक देखील केले.

   यावेळी बोलताना सुभाष नानेकर म्हणाले, मी फक्त एक जनसेवक असून लोकांची सेवा करण्यास आवडते. माझा सन्मान हा माझा नसून समस्त उत्तमनगर- कोंढवा-शिवणे -कोपरे ग्राम्सथांचा आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीदवाक्य घेऊन मी काम करत असतो. याप्रसंगी स्वामी महामंडलेश्वर शिवानंद महाराज(गोवा)श्री.प्रवीण बापू दांगट श्री.पै दत्ताभाऊ मारणे,श्री पै चेतनभाऊ धावडे आदी उपस्थित होते.