स्माईल फौंडेशनने केली ऍनिमिया विषयी जनजागृती

1512

मल्लिनाथ गुर्वे, पुणे

स्माईल फौंडेशनद्वारे हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय, मार्केटयार्ड पुणे येथील 65 किशोरवयीन मुलींना ऍनिमिया तपासणी,उपचार. किशोरवययात होणारे बदल आणि मासिक पाळीच्या स्वच्छता याविषयी तेजश्री गायकवाड हीने माहिती दिली.ऍनिमियाचा अर्थ म्हणजे रक्ताची कमतरता आणि ती हिमोग्लोबिन च्या तपासणीने समजते, ऍनिमियाचा दुष्परिणाम सांगून आहरविषयी प्रकल्प समन्वयक श्रीमती रेखा आनंद यांनी मार्गदर्शन केले.
तपासणी आणि औषधे देण्यात आली.

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. गिरमे सर, श्री. भगवान वाणी ,डॉ. लोहकरे, नर्स भाग्यश्री, फर्मसिस्ट सांची आणि खंडू उपस्थित होते.