कर्नाळ्याच्या बीएड महाविद्यालयात पार पडले स्वछता अभियान

637

गिरीश भोपी, कर्नाळा प्रतिनिधी,

शासकीय अध्यापक महाविद्यालय , अमरदीप बालविकास फाउंडेशन , जनजागृती ग्राहक मंच आणि कर्नाळा हास्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ स्वच्छता अभियान, सर्वेक्षण व पथनाट्य ‘ कार्यक्रम बी.एड.महाविध्यालयात दि.१६/३/२०१९रोजी अतिशय सुंदर आणि परिणामकारक पध्दतीने राबविण्यात आला.अध्यक्ष स्थानी प्राचार्य रमा भोसले होत्या.बी.एड.काॅलेजच्या विद्यार्थी–विद्यार्थिनी , प्राद्यापक वर्ग , संबंधित सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने एस टी स्टॅण्ड परिसर , साई मंदिर परिसर झाडून स्वच्छ केला.फावड्याचा वापर करून चिखल दूर केला.दुकानदारांना योग्य ते आवाहन करून ‘ कचरा बादल्या ‘ ठेवण्यास सांगितले.कचरा योग्य ठिकाणी टाकण्यास जनतेला आवर्जुन सांगितले.दोघांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.येत्या पावसाळ्यात झाडें लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले.प्राचर्य रमा भोसले , अभियंता बी.के.थोरात , संयोजक एन.डी.खान. यांचा आस्वासक आणि सकारात्मक द्दष्टीकोन सर्वांना भाऊन गेला.जनजागृती ग्राहक मंच , पनवेल शाखेचे अध्यक्ष काशीनाथ जाधव साहेब, उपाध्यक्ष सुभाष फडके साहेब, अत्तार साहेब, रमेश चव्हाण साहेब या प्रसंगी उपस्थित होते.काशीनाथ जाधव साहेब यांनी ग्राहक हक्क, आणि कामकाज विषयी माहिती दिली.सकाळी १० वाजता सुरू झालेला कार्यक्रम दु.दीड दोन वाजेपर्यंत चालला.