स्वच्छतेच्या सवयी मनावर बिंबविणे आवश्यक जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड

955

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

जिल्हा स्वच्छ आणि हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी नागरिकांच्या मनावर बिंबविणे आवश्यक आहे,अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यासाठी अधिक प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात‘शाश्वत स्वच्छता व शोषखड्डा घेण्याचा अभिनव संकल्प’विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे,प्रा. यजुर्वेद महाजन,अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते जिल्हा स्वच्छ करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. चांगल्या कामाची उजळणी करण्यासाठी आणि जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी नवा संकल्प घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.भारूड यांनी सांगितले महाजन म्हणाले, चांगल्या कार्यासाठी दृष्टीकोनात मुलभूत बदल होणे आवश्यक आहे केवळ कर्तव्याचा भाग म्हणून स्वच्छता अभियानाकडे न पाहता समाधान आणि आनंदासाठी कार्य करावे योग्य कार्यसंस्कृती दैनंदीन कामकाजात प्रतिबिंबीत झाल्यास प्रत्येक अभियान यशस्वी करणे सहज शक्य आहे. कामाचा आनंद मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे,असे आवाहन त्यांनी केले सोनवणे म्हणाले,जिल्हा मार्च 2018 मध्ये हागणदारीमुक्त झाला असून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अजूनही चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे 2 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात स्वच्छता करणे आणि उघड्यावर सांडपाणी दिसणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. शोषखड्यामुळे अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य असल्याने मनरेगाच्या माध्यमातून शोषखड्डे घेण्यात यावेत,असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला महसूल, कृषी,जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
—-
उज्वला योजनेमुळे जिल्हा धुरमुक्त होण्याकडे वाटचाल

केंद्र सरकारच्या उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात 82 हजारापेक्षा अधिक गॅस जोडण्या देण्यात आल्या असून धुरमुक्त होण्याच्या दिशेने जिल्ह्याची प्रगती सुरू आहे.
‘स्वच्छ इंधन,चांगले जीवन आणि महिलांचा सन्मान’या तीन सुत्रावर आधारीत ही योजना आहे योजनेअंतर्गत कुटुंबातील कर्त्या महिलेच्या नावाने मोफत गॅस जोडणी देण्यात येत आहे. गावांना धूर विरहीत बनविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या
दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. ही योजना महिलांसाठी विशेष ओळख ठरली आहे जिल्ह्यात
पुरवठा विभागातर्फे दारिद्र रेषेखालील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत याशिवाय जे कुटुंब या योजनेच्या निकषात बसतात त्यांच्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विस्तारीत उज्वला योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील 25 हजार 768,नवापुर19 हजार 396, शहादा 17 हजार 249,तळोदा 7 हजार 205,अक्कलकुवा 6 हजार 871आणि अक्राणी तालुक्यातील 5 हजार 596 कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे जिल्ह्यातील इतर 86 हजार 211 कुटुंब एक गॅसधारक आणि 58 हजार 367 कुटुंब दोन गॅसधारक आहेत त्यामुळे गॅस जोडणी असलेल्या एकूण कुटुंबांची संख्या 2 लाख 25 हजार 947 झाली आहे बिगर गॅसधारक 69 हजार 518 कुटुंब असून त्यांना उज्वला व विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशा 1 हजार 586 कुटुंबांना आतापर्यंत गॅस जोडणी मंजूर करण्यात आली आहे केवळ 100 रुपयात ही गॅस जोडणी देण्यात येणार असून त्यासाठी गॅस एजन्सीकडे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. गॅस जोडणी नसेलल्या कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.