कर्तव्यदक्ष पोलिस शिपाईमुळे वाचले ”वृध्द महिलेचे प्राण”

1329

भूषण गरूड पुणे,

बिबवेवाडीत घरासाठी किराणामाल आणण्यासाठी जात असताना इंदिरानगर चौका जवळ व शनी-मारूती मंदिरा समोरील रस्त्यावर संध्याकाळच्या६.३० च्या सूमारास चक्कर येऊन जोरात रस्त्यावर खाली पडल्यामुळे डोक्याला मार लागून डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. या घटनेमुळे रस्त्यावर बघ्यार्ची गर्दी जमली. त्याचवेळी तेथून बिबवेवाडी पोलिस मोबाईल पेट्रोंलीगचे पोलिस शिपाई दत्ता केंद्रे व त्याचे सहकारी पेट्रोंलिग करत असताना त्यांनी वृध्द महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होतोय पहताच क्षणी परीस्थतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या वृध्द महिलेस उचलून तेथून जाणाऱ्या रिक्षात बसवून विन्घहर्ता हॉस्पीटलमध्ये दाखल केले. कर्तव्यदक्ष पोलिस शिपाई दत्ता केंद्रे यांच्यामुळे तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्याने वृध्द महिलेचे प्राण वाचले व त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यामूळे त्यांचे पती व मूलांनी पोलिस शिपाई दत्ता केंद्रे यांचे आभार मानले आहेत.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जयश्री श्रीकृष्ण बेंद्रे(वय60, रा.लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी)  ह्या बुधवार दि.१३फेब्रुवारी २०१९ रोजी घरासाठी किराणा माल आणण्यासाठी इंदिरानगर चौका जवळ व शनी-मारूती मंदिरा समोरील रस्त्यावर आल्या असता त्यांना चक्कर(भोवळ) येऊन जोरात खाली पडल्यामुळे डोक्याला मार लागून डोक्याला जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. या घटने मुळे त्यांच्या अवती भवती बघ्याची गर्दी जमली होती कोणीही त्यांना मदत करत नव्हते. त्याच वेळी तेथून बिबवेवाडी पोलिस पेट्रोंलीगचे पोलिस शिपाई दत्ता केंद्रे, पोलिस शिपाई धूमाळ, पोलिस शिपाई भिसट्टे यांनी गर्दी का जमली आहे हे बघीतले असता तर त्यांना ऐक वृध्द महिला डोक्यातून रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या थाळोळ्यात पडली आहे हे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वृध्द महिलेस पो.शि.दत्ता केंद्रे यांनी उचलून घेतले  पो.शि.धूमाळ, पो.शि.भिसट्टे यांनी तेथूनच जाणाऱ्या रिक्षाला थांबवून त्या वृध्द महिलेला त्यात बसवून पो.शि.दत्ता केंद्रेनी स्वत: घेऊन लागलीच विन्घहर्ता हॉस्पीटल मध्ये दाखल केले. पोलिसांच्या संवेदनशीलते मूळे तात्काळ वैद्यकीय मदत मिळून त्या वृध्द महिलेचे प्राण वाचले व त्या महिलेची प्रकृती स्थीर आहे. 

या संदर्भातील माहिती पोलिसांनी त्यांच्या पती व मूलांना सांगितली. ते विघ्णहर्ता हॉस्पीटल मध्ये दाखल होताच त्यांनी पो.शि.दत्ता केंद्रे यांना रक्ताच्या माखलेल्या पोशाख पाहिले असता त्यांचे खूप खूप आभार मानले व तूम्ही नसता तर आज माझ्या आईचे बरवाईट झाले असते तूम्ही होता म्हणूनच आम्ही आईस जीवंत पाहू शकलो असे गौरवउदगार काढले त्यावर पो.शि.दत्ता केंद्रे यांनी नम्रपणे सांगीतले की आम्हा सर्व पोलिसांचा हेतू ऐकच असतो सर्व नागरीकांच्या जाण मालाचे संरक्षण करणे त्यासाठी किती परिक्ष्रम घ्यावे लागले तरी आम्ही घाबरत नाही तसेच कर्तव्यास बाधील आहोत. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मूरलीधर करपे, पोलिस निरीक्षक गून्हे शाखा राजेंद्र जाधव यांनी पोलिस शिपाईनी केलेल्या कर्तव्या बद्दल त्यांची प्रशंक्षा केली.