Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणविरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना ‘नवी मुंबई भूषण’ पुरस्कार प्रदान

विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना ‘नवी मुंबई भूषण’ पुरस्कार प्रदान

नवी मुंबई प्रतिनिधी,

नेरुळ गावचे सुपुत्र, युवा समाजसेवक तथा लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक/अध्यक्ष -विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई भूषण पुरस्काराने नुकतेच मुंबई प्रेस क्लब येथे सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय मानव विकास परिषद महाराष्ट्र व आदर्श मुंबई प्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या दहाव्या वर्धपन दिनाच्या प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार 2022 कार्यक्रमात प्रकृती, संस्कृती, अन्नदाता आणि जलविज्ञान वृक्ष दिप या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांचा नागरिकांना पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना नवी मुंबई भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नेरुळ गावचे सुपुत्र विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा नेरूळसह देश व विदेशातही उमटवला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. व नवी मुंबई भूषण पुरस्कार देण्यात आला. मराठी बिग बॉस फेम व आगरी बप्पी लहरी श्री. संतोष चौधरी उर्फ दादुस, मुबंई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग संप्रा, आयोजक दै. आदर्श मुंबईचे संपादक संजय जी भोईर यावेळी उपस्थित होते व यांच्या हस्ते विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना नवी मुंबई भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!