Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेआळंदीत एकादशी दिनी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट

आळंदीत एकादशी दिनी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट

अर्जुन मेदनकर, आळंदी

येथील षट्तिला एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास रांगा लावून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात एकादशी निमित्त लक्षवेधी आकर्षक फुलांची सजावट केली होती. मंदिरात भाविकां साठी उपवास असल्याने फराळाचा नैवेद्य आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

नदी घाटावर भाविकांनी तीर्थ स्नान करीत श्रद्धा जोपासली. इंद्रायणी नदीवर पूजन, दीप दान केले. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग भाविकांचे गर्दीने फुलला होता. मंदिरात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळेल याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरा जवळचे दुकानात वारकरी संप्रदायातील साहित्य खरेदी तसेच पूजा साहित्य, प्रसाद आदी खरेदीस भाविकांनी गर्दी केली होती. एकादशी दिनाचे प्रथा परंपरांचे धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments