स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त “जननायक” हे पुस्तक वाचून कोंढवा भागातील सामाजिक कार्यकर्ते भाजपा युवा नेते अक्षय शिंदे यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी श्रद्धांजली अर्पण केली. आदरणीय अटलजींचे जीवन हे राष्ट्रसेवा, प्रगल्भ विचारांचे प्रतीक होते. एक प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी आणि प्रेरणादायी नेता म्हणून त्यांनी भारतीय राजकारणात आपला अमीट ठसा उमटवला.
“जननायक” या पुस्तकाने त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलू उलगडले. श्रद्धेय अटलजी वाजपेयी यांना जयंतीदिनी हेच खरे विनम्र अभिवादन असेही शिंदे यावेळी म्हणाले.



