Friday, December 5, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपुण्यात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; 'झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार करा' -...

पुण्यात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; ‘झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार करा’ – जयश्री पुणेकर

अनिल चौधरी, पुणे:

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील मनपा प्राथमिक विद्यालय, उंड्री येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित या कार्यक्रमात भारताच्या संविधानाचे वाचन (Constitution Reading) आणि दामिनी पथकाविषयी (Damini Squad) विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई शशिकांत पुणेकर यांनी उपस्थितांना ‘झाडे लावा आणि पृथ्वी हिरवीगार करा’ असे आवाहन केले. झाडे ही पृथ्वीवरील जीवनाचा आधार असून, वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मातृशक्तीचा सन्मान आणि निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे, वसंतरावजी कड, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका सरचिटणीस सचिनभाऊ गावडे, विशेष कार्यकारी अधिकारी शशिकांतजी पुणेकर, मॉडेल सत्यम पुणेकर, काळे पडळ पोलीस स्टेशन येथील स्नेहल जाधव, पल्लवी पटाट, प्रियंका फडतरे आणि अतुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्रजी भिंताडे, वसंत कड आणि शशिकांत पुणेकर यांनी मुलांना निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच, पोलीस अधिकारी स्नेहल जाधव यांनी दामिनी पथकाविषयी माहिती देऊन मुलींना सुरक्षित जीवनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्रीताई पुणेकर यांनी केले, तर शाळेच्या मुख्याध्यापिका अलका ननावरे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. उपशिक्षक अमोल दळवे यांनी सूत्रसंचालन केले, तर घनश्याम अनभुले सर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षकही उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!