Friday, December 5, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकात्रज येथे महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्सहात

कात्रज येथे महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्सहात

पुणे प्रतिनिधी,

देश सेवा फाऊंडेशन आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि परि ब्युटी पार्लर यांच्या सहकार्याने जैन मंदिर कात्रज येथे रविवार दिनांक 29 जून महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
या कार्यक्रमाच्या वेळी कशिश सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार देशसेवा फाउंडेशनचे नरेंद्र पारखे, आई फाउंडेशन रायगडच्या सई वढावकर आणि स्वप्निल वढावकर, पूर्वा पाटसकर अस्मिता पारखे, भिमाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री किशोर भालेराव, परी ब्युटी पार्लर चे रेश्मा देडे, वर्षा कदम, श्रद्धा मुसळे, रोहिणी पाटील, तसेच, कीर्ती खडसे, लक्ष्मी शेंडगे, ओमकार पारखे, सुभाष वाघमारे, उत्तम धानवे, धवल पारखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.जी व्यक्ती आपल्या देशासाठी चांगले काम करत असेल त्यांच्यासोबत देश सेवा फाउंडेशन असेल. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये घरातील स्त्री ही संपूर्ण घराची काळजी घेते पण स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करत असते. या आरोग्यविषयक जन जागृती कार्यक्रमांमध्ये आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत आणि महिलाही आज मनमोकळे या उपक्रमात सामील झाल्या म्हणून आनंद वाटतो. तळागाळातील महिलांना स्वच्छतेचे योग्य शिक्षण मिळावे ती तिच्या आरोग्य विषयी जागरूक असावी याकरता कशिश फाउंडेशन कटिबद्ध आहे. आपण भारतभर कानाकोपऱ्यात जाऊन मोफत सॅनिटरी पॅड वाटप करतो पण कोणत्याही सॅनिटरी पॅड कंपनीची जाहिरात करत नाही. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हेच या कॅम्पेन मागील कारण आहे असे पुण्याचे प्रसिद्ध पॅडमॅन योगेश पवार म्हणाले.

आमच्या ब्युटी पार्लर मध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकाचे आम्ही फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर तिचे अंतर शरीरही कसे सुदृढ राहील याकरिता कटिबद्ध आहोत. आज देशसेवा फाऊंडेशन आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आम्ही सफल झालो परी ब्युटी पार्लर च्या संचालिका वर्षा कदम आणि रेशमा देडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!