Homeताज्या घडामोडीपुणे लघुपट महोत्सवात आगमन ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे लघुपट महोत्सवात आगमन ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे , नवोदित कलाकारांसाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या पुणे लघुपट महोत्सवात आगमन हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर फिंगर रिंग या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले आणि कासरा या लघुपटाची सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन म्हणून निवड करण्यात आली.
पुण्यातील सारसबागे जवळील बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन सभागृह मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक पत्रकार सुभाषचंद्र जाधव, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते निखिल मित्तल आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक कल्पना खरे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते. महोत्सवामध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले.
हिरवा सोन हा लघुपट सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला तर शाडो या लघुपाटासाठी स्टॅन्ली यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले .लास्ट ब्ल्यूम या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी पटकथेची निवड करण्यात आली. इनोसंट ट्रॅव्हल या राजीव मलिक दिग्दर्शित लघुपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली तर जोन्स या लघु पटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट म्हणून निवडण्यात आले. कलयुग हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पट ठरला तर ज्योती या लघुपाटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. या लघुपटासाठी अनंत केनी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक मिळाले. पेज बाउंड या लघुपटला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपाठाचे पारितोषिक मिळाले तर फॉरगॉटन नोट्स या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शनाचे पारितोषिक देण्यात आले. लेडी बग्स या लघुपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पटकथा लेखन म्हणून निवड करण्यात आली. माहितीपट विभागांमध्ये रिपल्स ऑफ गंगा हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला तर डिवाइन पेन या लघुपाटासाठी करण वाजीराणी यांची सर्वोत्कृष्ट माहितीपट दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली .आखाडाच्या महिन्यात या लघुकथासाठी भाग्यश्री मोटे यांची सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली. द इंट्रुडर या लघुपटाची सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट म्हणून निवड करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments