अनिल चौधरी, पुणे
मंत्रा ग्रुपने रणबीर कपूर यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या निमित्ताने २००७ मध्ये सुरू झालेल्या दोन प्रवासांची आज एकत्रित वाटचाल सुरू झाली आहे.
२००७ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या मंत्राने गेल्या जवळपास दोन दशकांमध्ये शहरात आपला भक्कम पाया निर्माण करत, पहिल्या पिढीतील उद्योजकीय उपक्रमापासून एक प्रस्थापित रिअल इस्टेट ग्रुपपर्यंतचा प्रवास केला आहे. रणबीर कपूर यांनीही २००७ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आपल्या विविधांगी कामातून ते आज या क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक म्हणून प्रस्थापित झाले आहेत.
मंत्रा आपल्या २०व्या वर्षात प्रवेश करत असताना ही भागीदारी होत आहे. पुण्यात उभारलेल्या मजबूत पायावर पुढे वाटचाल करताना नव्या पिढीतील घरखरेदीदारांशी जोडले जाण्याच्या मंत्राच्या प्रयत्नांना या सहयोगातून नवी दिशा मिळणार आहे.
दोन्ही नावांच्या प्रवासात अनेक साम्यस्थळे आहेत. दोघेही वारसा लाभलेल्या पार्श्वभूमीतून आले असले, तरी गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रिअल इस्टेट, डिझाइन आणि डेव्हलपमेंटच्या क्षेत्रातील आपल्या दृष्टिकोनातून मंत्राने सातत्याने स्वतःला विकसित केले आहे, तर रणबीर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधांगी कामातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
**मंत्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता** म्हणाले, *“आमच्या दोन्ही प्रवासांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. एकाच वर्षी सुरुवात करण्यापासून ते स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यापर्यंत आणि सातत्याने विकसित होत राहण्यापर्यंत हा प्रवास अनेक बाबतीत समान आहे. रणबीर यांचे मंत्राचा चेहरा म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत असून, त्यांच्यासोबत या पुढील अध्यायाची वाटचाल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”*
**रणबीर कपूर** म्हणाले, *“मंत्राने कालांतराने आपला प्रवास घडवून आणताना सातत्याने स्वतःला विकसित केले आहे, ही बाब मला विशेष भावली. पुण्यात मंत्राची मजबूत मुळे आहेत आणि आजच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीनुसार जागा आणि अनुभव निर्माण करण्याची त्यांची स्पष्ट महत्त्वाकांक्षा आहे.”*
या सहयोगाचा भाग म्हणून **रोहित गुप्ता आणि रणबीर कपूर एका नव्या ब्रँड फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहेत**, ज्यातून मंत्राच्या ब्रँड कम्युनिकेशनला नवी दिशा मिळणार आहे.
या भागीदारीसोबत **‘द फेस्टिव्हल ऑफ चॉइसेस’** ही ग्राहक-केंद्रित मोहीमही राबवण्यात येणार असून, या मोहिमेअंतर्गत मंत्राचा विविधांगी पोर्टफोलिओ एकाच छत्राखाली सादर केला जाणार आहे.



