शिक्षक महासंघ सभासद नोंदणीचा (Registration) देऊळगाव राजा येथून शुभारंभ

1017

 शेख इम्रान, बुलडाणा

जात, धर्म, पंथ यापलिकडे जाऊन काम कारणा-या नेतृत्वाला संधी द्या अन्यथा शिक्षणक्षेत्रात प्रश्नांचे प्रचंड डोंगर निर्माण होतील असे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त करीत शिक्षक महासंघाच्या सभासद (सदस्यता) नोंदणीचा शुभारंभही येथून करण्यात आला.
हॉटेल योगिराज देऊळगाव राजा येथे पार पडलेल्या तालुका पदाधिकारीआढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक प्रा.नितीन टाले, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष श्री. अविनाश कायंदे,श्री. Dnyaneshwar शेळके, श्री. बाबाराव डोईजड,प्रा. गजानन साबळे श्री.राजेंद्र शेळके,श्री.रामेश्वर चाटे, श्री. राजेंद्र राऊत,श्री.आशिष गुजर, श्री.किशोर खरात,श्री.प्रभाकर गायकवाड, श्री. देवाणंद डोईफोडे, बाबुसिंग चव्हाण,श्री.अशोक काळूसे, श्री.निलेश जायभाये,श्री.दत्तात्रय दंदाले,श्री.सुदर्शन शेळके,श्री.सुनिल चित्ते,प्रा. अरुण अहेर,श्री.राहुल राजे शिर्के,श्री.जी.एच.डोईफोडे, श्री.पी.डी गायके,श्री.ए.व्ही.राऊत,श्री.डी.टी. डोळे,श्री.के.पी.पवार,श्री.गजानन नागरे यासह बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थीत होते.या बैठकीचे संचालन श्री.आशिष गुजर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.केशव खरात यांनी व्यक्त केले.
शाळा तेथे शिक्षक महासंघ अभियानांतर्गत प्रत्येक शाळेतील प्रत्येक शिक्षकाला महासंघात सामील करून घ्यायचे आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडून सोडवण्याकरता व शिक्षकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याकरिता प्रबळ अशा संघटनेची आज नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येकाने शिक्षक महासंघ सदस्य नोंदणी मध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त संख्येने या महासंघात सामिल व्हावे.
शिक्षक हीच आपली जात असून आता धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या नेतृत्वाला आपल्याला संधी द्यायची आहे.अन्यथा या शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठी शिक्षकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे त्यासाठी आपण प्रत्येक क्षणी तयार असले पाहिजे असे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक प्राध्यापक नितीन टाले यांनी शिक्षक महासंघाचा आलेख मांडतांना शेखर भोयर यांना जेवढी गरज नसेल त्यापेक्षा जास्त गरज शिक्षकांना शेखर भोयर यांची आहे यासाठी आपण त्यांना सहर्ष साथ दिली पाहिजे व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे मत प्राध्यापक नितीन टाले यांनी व्यक्त केले.