Homeताज्या घडामोडीवानवडीमध्ये इतिहास घडणार ; भाजपाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी होणार ;...

वानवडीमध्ये इतिहास घडणार ; भाजपाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी होणार ; दिलीप कांबळे

वानवडी प्रभाग १८ भाजपा निवडणूक प्रचार कचेरीचे उद्घाटन

अनिल चौधरी , पुणे

राजकारणात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असताना पुण्याच्या प्रभाग क्रमांक १८ (वानवडी साळुंखे विहार ) मध्ये भारतीय जनता पक्षाने एक आदर्श आणि भावूक पायंडा पाडला आहे. पक्षासाठी आपले आयुष्य वेचणारे मा. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते व आमदार सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. वानवडीमध्ये इतिहास घडणार असून भाजपाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी होणार असे यावेळी दिलीप कांबळे म्हणाले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान हाच पक्षाचा कणा आहे निस्वार्थ सेवा आणि निष्ठेला वंदन करत उमेदवारांनी याप्रसंगी प्रचाराचा शुभारंभ केला.

भाजपचे अधिकृत उमेदवार कोमल शेंडकर , कालिंदी पुंडे, धनराज घोगरे, अभिजित शिवरकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसते, तर ती संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची संधी असते. आज भाजप ज्या उंचीवर आहे, त्यामागे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट आणि त्याग आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.”

असा रंगला उद्घाटन सोहळा

प्रभाग १८ मधील या अनोख्या सोहळ्यात ज्येष्ठ नगरसेविका कालिंदी पुंडे , ऍड अर्जुन खुरपे , ज्येष्ठ कार्यकर्ते तात्या शेंडकर, सुनील शेंडकर वानवडी परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. या हृद्य सोहळ्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments