Homeताज्या घडामोडी‘अक्षय कुमारच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाची स्क्रिप्ट असते’ – तुषार कपूरचा मोठा खुलासा

‘अक्षय कुमारच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाची स्क्रिप्ट असते’ – तुषार कपूरचा मोठा खुलासा

प्रतिभा चौधरी, पुणे

दिग्दर्शक अहमद खान यांचा धमाल विनोदी चित्रपट वेलकम टू द जंगल हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना अभिनेता तुषार कपूर यांनी अक्षय कुमारच्या काम करण्याच्या पद्धतीचे भरभरून कौतुक केले. तसेच दिग्दर्शक अहमद खान यांनी चित्रपटाच्या दृश्यरचनेत आणि सादरीकरणात कोणतीही तडजोड केली नसल्याचे सांगितले, ज्यामुळे चित्रपटातील मोठ्या स्टारकास्टला कथेत योग्य न्याय मिळाला आहे.

ते म्हणाले, “अहमद खान यांनी चित्रपट कसा दिसावा आणि कसा सादर व्हावा याबाबत कधीही तडजोड केली नाही. त्यांनी कथेत प्रत्येक कलाकाराला योग्य स्थान दिले आहे. कदाचित त्यामुळेच चित्रपट तयार होण्यासाठी वेळ लागला, पण हाच त्यांचा चित्रपटावरील जिव्हाळा आणि समर्पण आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला पुरेसा स्क्रीन टाइम देण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येकाला आपली वेगळी छाप उमटवण्याची संधी मिळाली आहे.

पुढे बोलताना तुषार कपूर यांनी सांगितले की, अक्षय कुमार सेटवर सहकलाकारांसोबत नेहमी मस्करी आणि खोड्या करत असले तरी ते इंडस्ट्रीतील सर्वात मेहनती आणि चपळ बुद्धीच्या कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना तुषार यांनी अक्षय यांच्या स्क्रिप्टवरील पकडीचेही विशेष कौतुक केले.

ते म्हणाले, “अक्षय खूपच हुशार आहेत आणि त्यांना संपूर्ण स्क्रिप्ट तोंडपाठ असते. ते सतत मजा-मस्करी करत असले तरी तितकीच मेहनतही घेतात.”अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची भव्य फौज पाहायला मिळणार आहे. यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अरशद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता, फरीदा जलाल, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, दलेर मेहंदी, आफताब शिवदासानी, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, किरण कुमार, जाकिर हुसेन, विंदू दारा सिंह, उर्वशी रौतेला, हेमंत पांडे, बृजेंद्र काला, फिरोज खान (अर्जुन), स्वर्गीय पंकज धीर, पुनीत इस्सर, सुदेश बेरी, जीतू वर्मा, वृहि कोडवारा, आदित्य सिंह आणि भाग्य भानुशाली यांचा समावेश आहे.

अहमद खान यांच्या या मनोरंजनाने भरलेल्या चित्रपटाची प्रस्तुती ए. ए. नाडियाडवाला, केप ऑफ गुड फिल्म्स आणि स्टार स्टुडिओज यांनी सीता फिल्म्स व राकेश डांग यांच्या सहकार्याने केली आहे. बेस इंडस्ट्रीज ग्रुप प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते राकेश डांग आणि वेदांत विकास बाली आहेत. फिरोज ए. नाडियाडवाला निर्मित वेलकम टू द जंगल हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments