अनिल चौधरी, पुणे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “अलार्म” या थीमवर आधारित आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी धोरणात्मक मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. पीएमसी आणि पीसीएमसीमधील ढासळत्या नागरी पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांचा वाढता असंतोष ओळखून, ही मोहीम शहरातील पाण्याच्या टँकरपासून ते वाहतुक कोंडीपर्यंतच्या नागरिकांच्या रोजच्या संघर्षावर केंद्रित आहे, केवळ नागरिकांची गैरसोय नाही तर महापालिका यंत्रणा अपयशी ठरल्याचा इशारा या मोहिमेतून देण्यात आलेला आहे.
गेल्या सहा महिन्यांत केलेल्या व्यापक *ग्राउंड सर्वेक्षणांवर* आणि *जनसंवादात* थेट प्राप्त झालेल्या तक्रारीद्वारे अजित पवार यांनी केलेल्या निरीक्षणांवर ही मोहीम आधारित आहे. दुर्गंधी युक्त कचऱ्याचे ढिग, नळाला पाणी नसणे, हवेची खराब झालेली गुणवत्ता (AQI) आणि ठप्प झालेली वाहतूक हे पुणे आणि पीसीएमसीमध्ये वाजणारे प्रमुख ‘अलार्म’ आहेत. “सध्याचे प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आणि विविध उपायोजनांची अंमलबजावणी करण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संदेश अतिशय सोपा आहे, अलार्म वाजतोय, आता पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांनी आपल्या शहराची स्थिती सुधारण्यासाठी हा अलार्म बंद करायचा आहे.”
एखादी समस्या शोधणं, त्याच्या मुळापाशी जाणं, लोकांच्या अडचणी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून समजून घेऊन, उमेदवार स्वतः त्या ठिकाणी उभे राहून या समस्यांवर व्हिडिओ बनवत आहेत. यामध्ये लांबच लांब टँकरच्या रांगा, दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग, रस्त्यावरचे खड्डे अशा ठिकाणी स्वतः उमेदवार जाऊन व्हिडिओ बनवत असल्याने अशा प्रकारचे हे पहिलेच कॅम्पेन ठरलेले आहे.
*”शिव-शाहू-फुले-आंबेडकर”* विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक पाया नेहमीच विकासाद्वारे सामाजिक कल्याणाला प्राधान्य देत आला आहे, फक्त घोषणा नाही तर विकासावर ही मोहीम लक्ष केंद्रित करत आहे. त्यात अजित दादा यांचा *”कामाचा माणूस”* म्हणून कामाची पद्धत अधोरेखित करण्यात आलेली आहे. कार्यक्षम प्रशासन हीच जनतेची सेवा आहे आणि हे तत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थापनेपासून आजपर्यंत तंतोतंत पाळलेले आहे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रशासन काळात विकास कधीही थांबला नाही आणि जनतेच्या प्रश्नांवर तसेच शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आले हेच या मोहिमेतून दिसून येते.
*’एक अलार्म, पाच काम’ थीम:*
– *पाणी:* २४x७ स्वच्छ पाणी पुरवठ्याची हमी (२४ तास ७ दिवस) स्वच्छ पाणी).
– *रस्ते आणि वाहतूक:* खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते (गतिमान पुणे/पीसीएमसी).
– *स्वच्छता:* वेळेवर कचरा संकलन आणि संपूर्ण स्वच्छता (स्वच्छ शहर).
– *सार्वजनिक जागा आणि प्रदूषण निर्मूलन:* सर्व वयोगटातील लोकांसाठी राखीव क्रीडांगणे आणि विरंगुळा पार्क आणि प्रदूषण नियंत्रण.
– *आरोग्य:* प्रत्येक प्रभागात सुसज्ज, सुलभ आरोग्य सुविधा.
पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांनी त्यांचे जीवनमान एका विशिष्ट उंचीपर्यंत उंचावलेले आहे. आज दोन्ही शहरांतील ढासळलेली प्रशासन व्यवस्था नागरिकांसाठी असंख्य अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड करांचे जीवनमान ढासळत आहे ही बाब ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील भागीदार असला तरी, स्थानिक महानगरपालिकेला पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी शिस्तीचे *”अजित पवार मॉडेल”* आवश्यक आहे हे या अभियानातून स्पष्ट होत आहे.
*’दादांनी सांगितलं आहे म्हणजे काम होणारचं’,* हा नारा नसून पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील नागरिकांच्या मागील तीन दशकांचा विश्वास आहे. अकार्यक्षमतेचा अलार्म वाजत असून काम पुन्हा सुरू करण्यासाठी *घड्याळावर बटन दाबा* असे आव्हान या मोहिमेतून करण्यात येत आहे.



