कोंढवा प्रतिनिधी
कोंढवा प्रभाग क्र 19 मधील लेडी हलिमा मतदान केंद्र क्रमांक. 93 वर मतपत्रिका चा उलटा क्रम लावल्यामुळे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर व शिवसेनेचे उमेदवार प्रसाद बाबर यांनी आक्षेप घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
कोंढवा कौसरबाग. प्रभागातील मिठानगर परिसरात असलेल्या मतदान केंद्राच्या बाहेर नागरिकांसाठी माहितीसाठी नमुना मतपत्रिका चिटकावलेली असते. ती अ. ब. क ड. अशी क्रमाने चिटकावणे जरुरीचे असते. निवडणूक आयोगाच्या गाफिल पणा येथे दिवून आला येथे उलट्या क्रमाने ब क अ ड अशी लावण्यात आली होती यावर मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर व शिवसेनेचे उमेदवार प्रसाद बाबर यांनी आक्षेप घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. तर केंद्रप्रमुख कांबळे यांनी त्वरित यावर दखल घेऊन दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. .
याबाबत साईनाथ बाबर म्हणाले , आम्ही मतदारांना अ ब. क ड. या प्रमाणे मतदान करायला सांगतो परंतु आत मध्ये सुद्धा मशीन सुद्धा उलट्या क्रमाने मशीन ठेवल्या होत्या तर अधिकाऱ्यांनी असे काही नसल्याचे सांगितले.



