Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेभारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी, पुणे शहरची कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी, पुणे शहरची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष श्री. महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली वर्धापन दिनी प्रभावी संघटन उभारणीचा संकल्प

पुणे, भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाच्या शुभ मुहूर्तावर भाजपा व्यापारी आघाडी – पुणे शहर चे अध्यक्ष महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
ही घोषणा मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री. धीरज रामचंद्र घाटे (अध्यक्ष, भाजपा पुणे शहर), मा. ना. श्रीमती माधुरीताई मिसाळ, मा. ना. श्री. पंकजजी भोयर तसेच मा. सौ. मंजुषाताई नागपुरे (महापौर, पुणे मनपा) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

या कार्यकारिणीत सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस व कार्यकारिणी सदस्य पदांवर विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

सरचिटणीस:
विक्रम चव्हाण, सुधींद्र कुलकर्णी, गजेंद्र देशपांडे, दर्शन किराड, विजय नरेला.

उपाध्यक्ष:
हरी सोनार, अभिजीत छाजेड, सुवर्णा शिंदे, राजकुमार अग्रवाल, अभिजीत भोसले, सरवजीत किराड, भरत राठोड, अमोल सीताराम बढे.

चिटणीस:
शैलेश भट्ट, करणा रेड्डी, सुमेर सिंह राजपुरोहित, झुंझार पाटील, वसंत कुरळे, राजेश कुलकर्णी, सुनील डोंगरे, कुमार खत्री.

कार्यकारिणी सदस्य:
उन्नी राघवन, ओजस कोठडीया, चेतन निंबाळकर, अमित देवराज जैन, रोशनी नायर, विजय शेकदार, अविनाश जगताप, मिठालाल जैन, प्रज्ञा अत्तर्डे, निमिषा रुईकर, प्रशांत श्रीवास्तव, प्रवीण कनाडिया, कुलदीप सोनी, श्रेयांस संजय सेठी,
किरण सोनिवाल, तूकाराम कोळी, विजय पंजाबी, उदय चौधरी, माधुरी मराठे, पवन कनोजीया, पूजा दोशी.

या कार्यकारिणीमार्फत व्यापाऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे, प्रशासनाशी सुसंवाद साधणे व व्यापारी वर्गाला सक्षम करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे.

पुणे शहरात भाजपा व्यापारी आघाडीची मजबूत उपस्थिती निर्माण झाली असून, व्यापाऱ्यांसाठी एक प्रभावी व विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून संघटना पुढे येत आहे, असे अध्यक्ष श्री .महेश गुप्ता यांनी सांगितले.

“प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” या तत्वावर कार्य करत समाज व व्यापारी वर्गाच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments