आळंदी स्वच्छता मोहिमेत वाढता लोकसहभाग

495

माझी वसुंधरा अभियानात जनजागृती  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :  येथील शहर स्वच्छता केवळ ग्रामपंचायत व नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरीकाने सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केल्या प्रमाणे येथील केळगाव ग्रामपंचायत, च-होली ग्रामपंचायत व आळंदी नगरपरिषद माझी वसुंधरा २.० अंतर्गत स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेसह प्रत्येक्ष स्वच्छता उपक्रमात विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी, नागरिक यांचा लोकसहभाग वाढत असल्याने या स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. आळंदी नगरपरिषदेने सलग आठ दिवस विशेष स्वच्छता अभियान प्रभाग क्रमांक १ ते ९ मध्ये सुरु केले असून यास परिसरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. 

  आळंदी नगरपरिषद, श्री साई कन्सल्टन्सी, आळंदी जनहीत फाऊंडेशन यांच्या माध्यमातून स्वच्छता विषयक जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी आवाहन केले आहे. यास परिसरातून लोकसहभाग मिळत आहे. आळंदीतील प्रत्येक प्रभागात नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम सकाळी आठ ते दहा या कालावधीत विशेष मोहिमेतून आयोजित करण्यात आला आहे. यात परिसरातील विविध सेवाभावी संस्था,पदाधिकारी,नागरिक सहभागी होऊन आपापल्या भागात स्वच्छता उपक्रम राबविण्यास पुढे आहे आहेत. २७ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या काळात रोज सकाळी विशेष स्वच्छता अभियान राबविले जात आत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ९ यांचा समावेश आहे. आळंदी बाह्यवळण मार्ग  येथे स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम राबवित या उपक्रमास आळंदी जनहित फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिक गती देण्यात आली. 

  सहभाग संस्थांत राजू गोटे अकॅडमी, यशवंत संघर्ष सेने, आळंदी जनहित फाउंडेशन, मयुरेश्वर सेवाभावी संस्था, एल्गार सेना, निळोबाराय महाराज वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानाई ग्रुप, पोलीस मित्र युवा  महासंघ, नेचर फाउंडेशन, पोलीस वेल्फेअर ऑफ इंडिया, स्वामी समर्थ परिवार, आळंदी नगरपरिषद शाळा, लक्ष्मीबाई दुराफे विद्यालय, ग्यानज्योत इंग्लिश स्कुल, श्रीमती भीमाबाई उपाध्ये इंग्लिश स्कुल, ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कुल, पत्रकार मित्र, भ्र्ष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास आळंदी शहर आदी  संस्थां सहभागी झाल्या आहेत. दर रविवारी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण, संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे कार्य समाज प्रबोधनातून केले जात आहे. स्वच, सुंदर,हरित आळंदीच्या या निमित्त संकल्प आणि स्वच्छ सर्व्हेक्षण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सहभागी आळंदी नागरपरिषदेस त्यांचे मार्गदर्शना प्रमाणे अभियान राबविले जात असल्याचे मुख्य समन्वयक आळंदी स्वच्छता मोहीम जनजागृती अभियानचे अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषद व श्री साई कन्सल्टन्सी यांचे माध्यमातून वृक्षारोपण मोहिमेस देखील गती देण्यात आली आहे.  

 या अभियानात राजू गोटे’ज करियर अकॅडेमीचे राजू गोटे, दयानंद गावास, भक्तराज गुटे,अशोक नागरगोजे, रोहित चितमपल्ली, सचिन झंजे, ओंकार काटकर, श्रवण राणे, निळकंठ गवस, यश काटकर, प्रतीक्षा माने, पायल चव्हाण, मनीषा हंकारे, ऋतुजा सिरसाठ, सौरभ नागरगोजे, पृथ्वीराज गुटे, कार्तिक गुटे, कार्तिक लोंढम, तुषार सिरसाठ, स्वप्नील साळुंके, आर्यन निळकंठ, आदित्य निळकंठ, यश कढणे, ओम एरंडे, यश सोनुने, सार्थक पोकळे, आदित्य बालमोरे, भागवत काटकर,शिवाजी जाधव,बाळासाहेब कवलासे, उदय काळे, किरण कोल्हे, बाजीराव नागरगोजे,शुभम पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, सचिन सोलंकर आदी उपस्थित होते. ग्यानज्योत स्कुल मध्ये आयोजित स्वच्छता मोहिमेत शालेय मुलांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी शाळा, परिसर स्वच्छ करण्यात आला. येथील शाळा क्रमांक ४ लगत असलेल्या हरिपाठ उद्यानात श्रीमती भीमाबाई उपाध्ये इंग्लिश माध्यम स्कुल देखील सहभागी झाली. ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आयोजित उपक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता उपक्रमात परिश्रम घेतले.