ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचा योग दिन उत्सहात साजरा

946

उत्तम आरोग्यासाठी योगा गरजेचा ; योगगुरु दिपक महाराज

अनिल चौधरी , पुणे

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने कात्रज येथील माउली गार्डनमध्ये विविध आसने , सूर्यनमस्कार, विविध प्रात्यक्षिके आणि योगगीतांमध्ये जागतिक योग दिन गुरुदेव श्री दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनात उत्सहात साजरा करण्यात आला .

       यावेळी आपल्या साधकांना संबोधित करताना गुरुदेव श्री दिपकजी म्हणाले कि, सुदृढ शरीरासाठी उत्तम आरोग्य आवश्यक आहे. ऋषीमुनींच्या काळापासून, आश्रम शिक्षणप्रणाली असल्यापासून गुरुकुलातील विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण दिले जात असे; परंतु कालांतराने आपणास त्याचा विसर पडला. शरीर स्वास्थ्यासाठी योगा आवश्यक असतानाही भारतीयांचा योगाकडे काणाडोळा होत गेला. शरीर स्वास्थ्याचे महत्त्व आपणाला उशिराने का होईना लक्षात आल्याने आता जास्तीत जास्त नागरिक योगा वर्गाकडे वळाले असून हि अंत्यत  चागली गोष्ट आहे. या दिवशी योगाचा नियंत्रित अभ्यास व्यक्तीला दीर्घायुष्य प्रदान करतो.शरीर स्वास्थ्यासाठी सुरू केलेल्या या कार्यक्रमाला आता उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कुटुंबामधील केवळ एक-दोन व्यक्ती नाही तर लहान लहान बालकेही आता सकाळी उठल्यावर न चुकता योगा करताना पाहावयास मिळत आहेत.

        आपले आरोग्य सुधारण्यासाठी योगासन महत्त्वाचे आहे. प्रत्येक योगासन वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करते व त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपल्या कुटुंबापासून आपण योगाची सुरुवात केली तरच आपल्याला योगा करण्याबाबत इतरांकडे आग्रह धरता येईल. आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या कुटुंबासोबत योगाने करा. त्यामुळे आपले त्यांच्या सोबतचे संबंध अधिक चांगले होतील. आपल्या एकमेकांच्या भावना आणि सवयी समजून घेण्यास मदत होईल. आपल्या कुटुंबात प्रत्येक वयोगटातील माणसे असतात, त्यांच्यासोबत योगा करण्यात वेळ घालवला, तर आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल. कोणती योगासने करायची ते ठरवा. योगासने करताना एकमेकांचा आधार घ्या. त्यामुळे मन एकाग्र करण्याची सवय लागेल. श्वासनासंबंधीचे इतर प्रश्न देखील सुटतील. आपल्या कुटुंबाला आपल्या समस्या स्वत:हून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यावर मिळणारे उत्तर शांतपणे ऐकून घ्या. आपल्या कुटुंबासोबत बसून योगासने केल्याने दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होईल. आपली चिडचिड, छातीत सतत जळजळणे व सकाळी थकवा जाणवणार नाही. आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. ब्रह्ममुहूर्तावर योगा केल्याने आपल्यासोबत मुलांनाही व्यायाम करण्याची सवय लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. त्यासाठी आपण दररोज योगा करायला हवा. जागतिक योगादिनी सर्वांनी उत्साहात सहभागी व्हा. हा कार्यक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आयुष्याचा एक भाग बनवा. निरोगी जीवनाकडे वाटचाल करा असेही गुरुदेव दिपकजी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले.

यावेळी राजाभाऊ कदम, राजेंद्र भिंताडे, संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे, समीर शेंडकर, केंद्राचे अध्यक्ष शशिकांत अंनदास सर, अश्विनी पासलकर, सुधीर गरुड, वैशाली शिळीमकर, रवींद्र औटी, दिवाकर गोरे, प्रतिभा मोरे, आरती कदम, अनिल राऊत, शशिकांत पुणेकर, नितीन थोपटे, गणेश नलावडे, संतोष गोरड, नवनाथ मोरे, प्रदीप पवार, कालिदास लोणकर, विजय लोणकर, प्रवीण पवार, अमोल कार्तुर्डे , दादा रणदिवे, भानुदास होले, प्रवीण पवार , जयश्री पुणेकर , गौरी फुलावरे, भावना घरोडिया , दर्शन किराड , दीपक गोरे, संदीप कोठावळे, पायगुडे सर, पत्रकार अनिल चौधरी आदी उपस्थित होते.