आळंदीत पोलीस आरोग्यसेवक पत्रकार यांची तपासणी

748

अर्जुन मेदनकर,आळंदी

येथील आळंदी च-होली डाँक्टर्स असोशिएशन तर्फे कोरोनाचे पार्श्वभुमीवर बंदोबस्तावरील व कामावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी,पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार यांची आरोग्याची काळजी घेत तपासणी करण्यात आली.यावेळी आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर,आळंदी नगरपरीषद मुख्याधिकारी समिर भुमकर,असोशिएशनचे अध्यक्ष डाँ. विकास पाटील,डाँ.अबालाल पाटील ,डाँ. सारंग जोशी,डाँ.मोनिका भेगडे यांनी मार्गदर्शन केले.आळंदीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास विविध उपाययोजना होत आहेत.याचाच भाग म्हणुन अधिकारी,कर्मचारी,आरोग्य सेवक व पत्रकार यांचेआरोग्याची काळजी घेत तपासणी करत मार्गदर्शन व रोग प्रतिकार शक्ती वाढविणा-या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.आळंदीत प्रभावी संवाद साधत कोरोना रोखण्यास कामकाज होत असल्याचे मुख्याधिकारी समिर भुमकर यांनी सांगितले.
आळंदीत डाँक्टर्स असोशिएशन तर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.यात नागरीकांची आरोग्य तपासणी,गरजुंना किराणा साहित्याचे किट वाटप,जनजाग्रूती केली जात आहे.यासाठी अध्यक्ष डाँ विकास पाटील,नितीन जाधव,अंबालाल पाटील आदींनी परीश्रम घेतले.