आरोग्य कर्मचारी आणि लसींची संख्या वाढवावी : दीपक कामठे

1054

अनिल चौधरी, पुणे

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु केली आहे. या लसीकरणाला नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असून लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत.  कोंढवा बुद्रुक प्रभाग क्रमांक ४१ येथील सावित्रीबाई फुले महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. येथे आरोग्य कर्मचाऱ्याची संख्या  अपुरी असून  यामुळे नागरिकांना तासंतास ताटकळत थांबावे लागत आहे. तसेच तसेच येथे लसींची साठा अपुरा असून यामुळे नागरिक आणि आरोग्य कर्मचारी यांची वारंवार बाचाबाची होत असून यावर तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दीपक कामठे यांनी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांकडे केली आहे. तसेच येत्या आठ दिवसात लास आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या वाढविली नाही तर मोठे जनआंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना अधिकारी जबाबदार असतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

कोंढवा ब्रुद्रुक येथील लसीकरण केंद्रावर रोज चारशे ते पाचशे नागरिक लसीकरणासाठी येत असून येथे रोज फक्त शंभर ते दीडशे नागरिकांचे लसीकरण होत आहे. आणि इतर नागरिकांना अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी केंद्रावर यावे लागते  यामुळे नागरिक सकाळी आठ वाजताच लाईन मध्ये उभे असतात. तसेच आता लसींचा साठा देखील अपुरा असल्याची माहिती येथील आरोग्य कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पधाधिकारी दीपक कामठे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारींचा पाढा दिल्यानंतर  त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याना  आरोग्य कर्मचारी आणि लसींची संख्या वाढविण्याबात इशारा दिला आहे.