शिवनेरी ट्रस्ट ढोल ताशा पथकाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा एक हात

788

गणेश जाधव, पुणे

कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. राज्यातच नव्हे तर आसपासच्या राज्यांमध्ये येणाऱ्या संकटात मदतीचा हात पुढे करणारी पुण्यातील अनेक ढोल ताशा पथक पुन्हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली असून पूरग्रस्तांसाठी मदतयज्ञ सुरू झाला आहे.

गरजू व्यक्तीना मदत करण्याच्या उद्देशाने शिवनेरी ट्रस्ट ढोल ताशा पथकाच्या सामाजिक दृष्टीकोनातून ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम २७ जुलै २०२१ पासून सुरू केला आणि अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते ,सेवक वर्ग ,तरुण मित्रमंडळी यांच्याकडून मदतीचा ओघ सुरू झाला आणि पाहता पाहता५०० अन्नधान्याची किट तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा जमा केला गेला.

शिवनेरी ट्रस्ट ढोल-ताशा पथकाचे कपिल मादन यांच्या कल्पनेतून ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. पथकाच्या सदस्यांकडून समस्त नागरिकांना या उपक्रमासाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आहे. जुन्या कपड्यांसह उपयोगात येणारे जुने साहित्य त्यांनी यासाठी द्यावे, असे स्थानिक नागरिकांना कळविण्यात आले .आतापर्यंत एक ट्रक साहित्य जमा झाले.साहित्य जमा करण्यासाठी शिवनेरी ट्रस्ट ढोल-ताशा पथकाच्या शिवनेरी नगर,कोंढवा खुर्द येथील कार्यालयाजवळ तंबू टाकण्यात आला आहे. पथकातील दोन सदस्य तंबूमध्ये बसवण्यात आले आहेत. साहित्य जमा करण्यासाठी खोके ठेवण्यात आले आहेत.शिवनेरी ट्रस्ट ढोल ताशा पथकाच्या सदस्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील या उपक्रमात सहभागी होऊन एक हात मदतीचा पुढे करू शकणार आहेत.

शिवनेरी ट्रस्ट ढोल ताशा पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढवा खुर्द येथील सदस्यांनी मदतीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांसह विभागातील लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. पथकाच्या वतीने कपडे, सुका खाऊ अशा वस्तू देण्याच्या विचार सुरू आहे. तसेच तेथील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा मानस पथकाचे विश्वस्त सुजेश मालुसरे ,मयुरेश खरात यांनी व्यक्त केले आहे.

पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू राहावा यासाठी आता पथकाचे सदस्यांनी पुढाकार घेतला आहे . ‘कोकण हे फक्त सहलीनिमित्ताने फिरण्यासाठी नाही. आज तिथे आपल्या मदतीची खरी गरज आहे. शक्य असेल तितकी मदत करा,’ असे आवाहन अभिजित लोखंडे यांनी केले आहे. तर पथकाचे तरुण धडाडीचे कार्यकर्ते आकाश जाधव यांनीही टॉवेल, कपडे, चटई, चादरी यांची मदत पूरग्रस्तापर्यंत पोहोचवली आहे. कोकण प्रांतातील परिस्थिती अत्यंत बिकट असून तिथल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगत देवानंद कोळी यांनी समाजमाध्यमांचा आधारे मदतीचा मार्ग खुला करून दिला आहे.

महाडमधील बिरवडी ,आदर्श नगर या गावात जाऊन तेथील गरजू लोकांना अन्नधान्याचे किट आणि जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथील लोकांना या पूरजन्य परिस्थितीच्या काळात खूप अडचणी येत असल्याचे समजले. त्यामुळे तेथील लोकांची गरज लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधीलकीची भूमिका घेऊन एक आठवडा पुरेल एवढे अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

निवाऱ्याच्या दृष्टीने चटई, चादरी, कपडेदेखील गरजू नागरिकांना दिल्याचे शिवनेरी ट्रस्ट ढोल ताशा पथकाचे विश्वस्त सुजेश मालुसरे यांनी सांगितले.

या कार्यात अभिजीत लोखंडे ,देवानंद कोळी ,आकाश जाधव, अजय बागली, अभिषेक रणपिसे ,सुशांत कदम, सुशांत पाटील, यांनी मदत केली. यावेळी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेची शिवनेरी ट्रस्ट ढोल ताशा पथक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे आत्मिक समाधान मिळत असल्याचे ट्रस्टचे खजिनदार शिवा जाधव यांनी व्यक्त केले.