ससून रुग्णालयातील सात वयोवृद्ध कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनावर मात…

770

जगण्याची नवी आशा आणि नवी उमेद

गणेश जाधव, प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पुणे शहरात दिसत आहे .पुण्याच्या विविध भागात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आले .आरोग्य विभाग, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. नवनवीन उपाययोजना तसेच कडक नियमावली प्रशासनाकडून सर्वसामान्यांकरिता आखली जात आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासन वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून सर्वसामान्यांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत .

आरोग्य विभागाकडून अनेक संशयित कोरोना रुग्णांना जिल्हा प्रशासनाच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले .ससून रुग्णालय प्रशासनाकडून दाखल झालेल्या रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून वरिष्ठ डॉक्टरांच्या आदेशावरून रुग्णांची नियमित काळजी घेऊन योग्य तो औषधोपचार करण्यात आला त्याचेच फलित आज ७ वयोवृद्ध कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले. रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे आज हे शक्य झाले असे मत कोरोना बाधित रुग्णांनी व्यक्त केले.

ससून रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेली रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे :
१) येरवडा विभागातील ६५ वर्षे( पुरुष)

२)गुलटेकडी विभागातील ६५ वर्षे( पुरुष)

३)मुकुंद नगर परिसरातील ६४ वर्षे (पुरुष)

४)गंजपेठ परिसरातील ६० वर्षे (पुरुष)

५)शुक्रवार पेठ परिसरातील ५५ वर्षे (पुरुष)

६)पर्वती दर्शन परिसरातील ५५ वर्षे (महिला)

७)गणेश नगर ,दापोडी परिसरातील ५० वर्षे( पुरुष )

एकूण ७ वयोवृद्ध रुग्णांपैकी सहा पुरुष व एक महिला रुग्ण यांनी कोरोनावर मात करत पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद समाजापुढे ठेवली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या वतीने ससून रुग्णालय प्रशासनाचे आभार मानण्यात आले तसेच कोरोना बाधित वयोवृद्ध रुग्णांनी ससून रुग्णालयाच्या डिस्चार्ज करते वेळेस पाणावलेल्या डोळ्यांनी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा हसतमुखाने आभार मानून निरोप घेतला .ससून रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या रुग्ण काळजीचे व अथक मेहनतीचे सर्व समाजातील सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.