वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी बांधकाम विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न

962

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

जिल्ह्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर नागरिकांना मदत करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाच्या सर्व विभागांनी वेगाने प्रयत्न सुरू केले असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहे जिल्ह्यातील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसानंतर धडगाव, नवापूर,अक्कलकुवा,मोलगी, तळोदा भागातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूकदेखील प्रभावीत झाली होते पाऊस थांबताच प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे धडगाव तालुक्यातील कोयलीविहीर येथील रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करून तेथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे कात्री-खडक्या
इजिमा133 बिलगाव आणि जारली-चुलवड रस्त्याचे दुरूस्तीचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे जारली पूलाची दुरूस्तीदेखील करण्यात येत आहे तळोदा-धडगाव
राज्य महामार्ग क्र.8 वरील चांदसैली घाटात मोठ्या प्रमाणात दरडी आणि वृक्ष कोसळले होते ते बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावरून दरडी बाजूला करून एक बाजू वाहतूकीसाठी मोकळी करण्यात आली आहे. पाहिल्या पावसानंतर धडगाव-तळोदा रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला होता मात्र दुसऱ्या पावसाने या मार्गाला मोठ्या प्रमाणात क्षती झाली असून रस्ता दुरूस्तीचे काम वेगाने सुरू आहे वाकी नदीवरील पूलाच्या दुरूस्तीचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी 7 ऑगस्ट रोजी नवापूर तालुक्यात भेट देऊन राज्य महामार्ग क्र.9 च्या दुरूस्तीच्या सुचना दिल्या होत्या हा मार्ग महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणारा आहे.सा.बां. विभागातर्फे आठवडाभरात काम करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते तथापी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून तीन दिवसात तात्पुरत्या स्वरुपात वाहतूकीसाठी मार्ग तयार केला आहे रस्त्याच्या बाजूला गॅबियन भिंत तयार करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात पंचनामे करण्याचे काम वेगात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामदेखील वेगाने करण्यात येत आहे. अधिकारी-कर्मचारी नागरिकांपर्यंत पोहोचून नुकसानाची माहिती घेत आहेत. अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे आणि दिलीप जगदाळे यांनी नवापूर तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना तात्काळ मदत करण्याच्या कामात प्रशासन सुटीच्या दिवशीदेखील वाड्या-पाड्यावर पोहोचलेले दिसत आहे.

 

अक्कलकुवा तालुक्यातील भराडीपादर गावाच्या घाटपाडा गावाचा संपर्क तुटला

 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील भराडीपादर गावाचा घाटपाडा येथील सुमारे 40 कुटुंबांचा अतिवृष्टीमुळे देहली नदीला महापुर आल्याने संपर्क तुटल्याने आ.एड.के.सी.पाड़वी भेट दिली असता प्रशासनासह आमदार पाडविंच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतुन जोपासत आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात आली खापर येथील माजी उपसरपंच ललित जाट यांच्यासह गटनेते सुरेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक मदत पोहचविण्यात आली यावेळी पिड़ीतांना कांग्रेस पक्षाच्या वतीने तांदुळ,तुरडाळ, तेल,गव्हाचे पिठ,बिस्किटं,केळी, भाजीपाला,चहा,साखर इत्यादी सर्व प्राथमिक जीवनावश्यक वस्तूच्या सामग्रीसह औषधांचा साठा नदी पात्रातुन दोराच्या सहाय्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या मदतीने पलिकडच्या वस्ती पर्यंत पोहचवण्यात आला यावेळी संजय चौधरी,रमेश वसावे, अमृत चौधरी,विरबहादूरसिंह राणा,अनिल चौधरी,राजू टाक,भाऊ परदेशी,राजेश वसावे,जयदास वसावे,इब्राहिम वसावे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्यांदा अश्या प्रकारची मदत मिळाल्याने पिड़ीतांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसुन आले. दरवर्षी अश्याच त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे प्रशासनाने बारमाही संपर्क राहिल असे पुल बांधण्याचे नियोजन करावे अशी मागणी पिड़ीतांनी केली.