आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड तालुका बार असोसिएशन अध्यक्ष पदी ॲड. नवनाथ किसन गावडे यांची बहुमताने निवड झाल्या बदल त्यांचा आळंदी पंचक्रोशीतील विविध संस्था, संघटना, पदाधिकारी यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टचे अध्यक्षॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीचे आळंदी पंचक्रोशीत स्वागत करण्यात आले असून ॲड.गावडे यांचेवर अनेक सेवाभावी संस्थानी सत्कार करून शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
ॲड.नवनाथ गावडे यांची खेड तालुका बार असोशिएशन खेड तालुका अध्यक्ष पदी बहुमताने निवड झाल्या बद्दल संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थानचे वतीने अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक माऊली रायकर, आळंदी जाहीर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माऊली घुंडरे पाटील, गंगाराम घुंडरे आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, एल्गार सेनेचे आळंदी अध्यक्ष बाळासाहेब कवळासे , विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, पत्रकार अनिल जोगदंड, सचिन सोळंकर यांचे वतीने सत्कार करण्यात आला.
आळंदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत घुंडरे पाटील यांचे वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. नवनाथ गावडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी किशोर घुंडरे , बापू बवले,आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ॲड. गावडे यांनी कायदे विषयक अडचणी साठी संपर्क करावा असे आवाहन केले. योग्य व सर्वोतोपरी कायदेशीर मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड गावडे यांच्या निवडीचे स्वागत करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देत सत्कार केला.यावेळी अतुल उंद्रे,सागर लोखंडे, ॲड संभाजी बवले, बापूसाहेब बवले आणि मित्र परिवार उपस्थित होते.