स्वकुळ साळी ज्ञातीगृहाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

304

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील स्वकुळ साळी समाज बांधवांच्या वतीने राज्यातील भाविक , भक्तांसह समाज बांधवांच्या सोयीसाठी विकसित करण्यात आलेल्या भव्य ज्ञातीगृहाच्या इमारतीत श्री भगवान जिव्हेश्वर महाराज यांची मूर्ती, माता अंकिनी, दशांकिनीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यास १७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त स्वकुळ साळी ज्ञातीगृहाच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणवंतांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी महापौर नितीन काळजे, खजिनदार मनोहर दिवाणे, उपाध्यक्ष अमित उगले,अध्यक्ष चंद्रकांत हावरे, उद्योजक दीपक अरबुणे, सेवा निवृत्त वरिष्ठ मॅनेजर एम.टी.एन.एल अनिल सातपुते, उद्योगपती स्वकुळरत्न जे.आर.दळवी, विद्यार्थी सहाय्यक मंडळ अध्यक्षा श्रीमती शांताबाई जंत्रे, अक्षय चंदावरकर, उद्योजक शिरीष जठार, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी उपाध्यक्ष रामदास भोसले, शाम कोलन, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष नंदकुमार वडगावकर आदी मान्यवर तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात आलेले समाज बांधव , पदाधिकारी उपस्थित होते.
१७ व्या वर्धापन दिना निमित्त ५ मान्यवरांना मरणोत्तर सन्मानपत्र आणि संस्थेचे कार्यास योगदान देणाऱ्या ५ मान्यवरांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. समाजातील गुणवंत विदयार्थी यांचा सत्कार, ७५ वर्षां वरील समाजातील जेष्ठांचा सत्कार, तसेच कोरोना महामारीचे काळात केलेल्या विशेष सेवेचे कार्य केले त्यानिमित्त पोलीस, आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, क्रीडाक्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव यासह वैयक्तिक सेवा कार्य आणि संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवर समाज बांधवांचा सत्कार करण्यात आल्याचे संस्थेचे खजिनदार मनोहर दिवाणे यांनी सांगितले.
यावेळी कोरोना काळात केलेल्या सामाजिक , प्रशासकीय कार्याबद्दल आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे सह विविध मान्यवरांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, खजिनदार मनोहर दिवाणे, उपाध्यक्ष अमित उगले,अध्यक्ष चंद्रकांत हावरे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी उपाध्यक्ष रामदास भोसले, शाम कोलन आदी उपस्थित होते.
स्वकुळ साळी ज्ञातीगृहाच्या १७ व्या वर्धापन दिना निमित्त गंगा पुजन, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन संधी मंदिरात पाद्यपूजा , भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांची पंचामृत महाअभिषेक पूजा, वर्धापन दिना समवेत कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हावरे, उपाध्यक्ष अमित उगले, सचिव देवेन क्षीरसागर, सहसचिव प्रवीण जुंदरे, खजिनदार मनोहर दिवाणे तसेच सर्व सभासद पदाधिकारी यांनी परिश्रम पूर्वक नियोजन केले. या वर्षीचे कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसाद वाटपाने वर्धापन दिन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.