Monday, April 28, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीआजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

पुणे प्रतिनिधी ,

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.

एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता. आज तो GR निघाला आणि आजपासूनच सर्व प्रकारच्या एसटी गाड्यांमध्ये प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!