Monday, April 28, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीजुनी पेन्शन मागणीसाठी पुणे महानगरपालिका शिक्षक समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालय ,पुणे येथे...

जुनी पेन्शन मागणीसाठी पुणे महानगरपालिका शिक्षक समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालय ,पुणे येथे महामोर्चाचे आयोजन…

गणेश जाधव, पुणे प्रतिनिधी

जुनी पेन्शन मागणीकरिता दि. १४मार्च २०२३,पासून पुणे महानगरपालिका शिक्षक समन्वय समिती तसेच मध्यवर्ती कर्मचारी समन्वय समिती राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत.अनेक शासकीय ,निमशासकीय संघटना या संपामध्ये सहभागी आहेत…
जुनी पेन्शनच्या मागणीकरिता सर्व संघटनांनी पुणे जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आज महामोर्चाचे आयोजन केले .या मोर्चामध्ये सर्व संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच जुन्या पेन्शनची मागणी लावून धरत विविध घोषणांच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरले…
“जुनी पेन्शन हा आमचा हक्क आहे त्याकरिता आम्ही सर्व संघटना कटिबद्ध आहोत “असे मत शिक्षक समन्वय समितीचे सदस्य बाळकृष्ण चोरमले यांनी मांडले..
जुनी पेन्शन हा आमचा हक्क असला, तरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शालेयवेळे व्यतिरिक्त जादा तास घेऊन पूर्ण करू अशी ग्वाही शिक्षक समन्वय समितीचे सदस्य विकास काटे यांनी दिली…
जुनी पेन्शन ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे उतार वयात पेन्शनशिवाय पर्याय उरत नाही असे मत शिक्षक समन्वय समितीचे सदस्य नितीन राजगुरू यांनी व्यक्त केले..
या महामोर्चाला पुणे महानगरपालिकेचे अडीच हजाराहून अधिक शिक्षक सहभागी असल्याचे समजले.. इतर विविध संघटनाचा देखील यात सहभाग असल्याचे पाहायला मिळाले..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!