कोंढचा प्रतिनिधी,
दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादातून धारदार हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पैकी एका आरोपीस कोंढवा पोलिसांनी चार तासांत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
साईनगर गल्ली नं २ येथे सोमवारी (ता. २७) रात्री दहाच्या सुमारास रोहित अशोक खंडाळे (वय २४ वर्षे, रा. स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु., पुणे) हे त्यांचा मित्र वैभव साळवे यांच्या सह दारू पिण्यास बसले होते. त्यांच्या शेजारी परिसरात राहणारा आरोपी मंगेश माने, सागर जाधव, पवन राठोड, सुरज पाटील व अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर हे सुद्धा दारू पिण्यास बसले होते. दारू पित असताना झालेल्या वादातून आरोपी यांनी त्यांच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादी यांच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले आणि सदर ठिकाणावरून पळून गेले. सदरबाबत कोंढवा पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ३२७/२०२३ भादंवि कलम ३०७,३२६,३२३,५०४, १४३, १४७, १४८, १४९, व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(२).(३) सह २३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.