कोकणातील अविस्मरणीय “परशुराम वाडा “

356

अनिल चौधरी , पुणे

कोकण म्हणजे पृथ्वीतळावरचा स्वर्ग आहे. कोकणातील हिरवे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते. संपूर्ण कोकणपट्टी निसर्गसौंदर्याने रसरसलेली आहे. कोकणाला सागर आणि संह्याद्री यांचे वरदान लाभले आहे. आपणाला शांत ,एकांत ठिकाणी आणि समुद्राच्या जवळ म्हणजेच बीच जवळ वास्तव्य करायचे आणि शांत ठिकाणही हवे तर चला तर मग अलिबाग येथील नागाव बीच जवळील परशुराम वाडा आपल्यासाठी अगदी उत्कृष्ट ठिकाण आहे.  समोर अथांग अरबी समुद्र आणि मधोमध सोनेरी वाळूचे किनारे अशा विलोभनीय देखाव्यांमुळं एकदा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील परशुराम वाडा येथे  आलेल्या पर्यटकाला वारंवार कोकणात यावसं वाटतं.

  परशुराम वाडा म्हणजे अतिशय सुंदर असे हॉटेल पण आपल्याला वाड्याची सैर करणारे  आहे.        परशुराम वाड्याचे मालक  आशुतोष सुहास वाळके, ऋषीकेश दत्तात्रय वाळके, अभिषेक उत्तम वाळके यांनी आपल्या आधुनिक विचारांनी या वाड्याची निर्मिती केली असून आताच्या सर्व सुखसुविधा त्यांनी दिल्या आहेत .प्रशस्त रूम , कपल रूम , फॅमिली रूम, जाकुजी रूम तसेच स्विमिंग पूल अशा विविध सुविधा त्यांनी आपल्या संकल्पनेतून साकारले आहे. 

   ग्राहकांशी सौजन्याने वागणारा अतिशय नम्र कर्मचारी ,अतिशय रुचकर जेवण ,न्याहारी आणि व्हेज आणि नॉन व्हेज वेगवेगळे प्रकार येथील आचारी बनवून देतात. कोकणातील मासे तर हे अतिशय चागले बनवूंन देतात . चवीने खाणार त्यांना परशुराम वाडा देणार असेच येथे राहणारे नागरिक ग्राहक आपली प्रतिक्रिया याठिकाणी व्यक्त करतात. 

 प्रशस्त स्विमिंग पूल असल्याने आपल्याला पोहण्याचा अगदी वेगळाच अनुभव याठिकाणी मिळतो. लहान मुलांसाठी वेगळा स्विमिंग पूल येथे आहे. तसेच कपल साठी जाकुजी सुविधा उपलब्ध असून ते आपल्या रूम मध्येच स्विमिंगचा अनुभव घेऊ शकतात.

तेंव्हा कोकणाची सैर करायची असेल तर नक्की एकदा परशुराम वाडा नागाव बीच जवळ याठिकाणी भेट द्यावी .तसेच वाळके बंधूंचा पाहुणचार अनुभवावा….