अनिल चौधरी, पुणे
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असे काही लोकांच्या बाबतीत म्हटले जाते. यात लहान मूर्ती म्हणजे बर्याचदा उंची आणि वय याच्याशी संबंधित असते. पण यांच्या कामगिरीपुढे या सर्व गोष्टी गौण ठरू लागतात आणि ही लहान मूर्ती महान काम करून नावलौकिक मिळवतात. अशीच एक लहान मूर्ती आपल्या कीर्तीने केवळ आपले वा कुटुंबाचेच नाव नव्हे तर शाळेचे नावदेखील मोठे करत आहे, यशाचे नवनवे शिखर गाठून भल्याभल्यांना अचंबित करीत आहे. अशा या अतुलनीय कामगिरी करणार्या लहान खेळाडूचे नाव आहे, शांभवी अविनाश गोगावले वय वर्ष 5 फक्त . यश कसे असते याचे वर्णन करणार्या वरील चार ओळी शांभवीला तंतोतंत लागू पडतात. कै हनुमंतराव तुकाराम थोरवे शाळा १६२बी मनपा शाळा भारती विद्यापीठ पुणे येथे शिकणार्या “शांभवी अविनाश गोगावले ” हिने ‘स्केटिंग’मध्ये यशस्वितेची जी भरारी घेतली आहे, ती अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी आणि प्रेरणादायी आहे.
लहान मुले ही मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. शांभवीच्या बाबतीत काहीसा असाच प्रकार झालेला पाहायला मिळतो. ती साडेतीन वर्षांची असल्यापासून ‘स्केटिंग’ करते आहे. तिच्यात ही आवड निर्माण झाली ती तिची बहीण विश्वजा हिला ’स्केटिंग’ करताना पाहून. विश्वजा ही तिची मोठी बहीण असून ती नियमित ‘स्केटिंग’ला जाते. मग शांभवीला देखील ‘स्केटिंग’चा हट्ट धरू लागली आणि ती तिचे ‘स्केट शूज’ घालून घरात ‘स्केटिंग’ करायला लागली . तिची ‘स्केटिंग’मधील गती आणि आवड पाहून घरच्यांनी तिला ‘स्केटिंग’ क्लासमध्ये पाठवण्याचे ठरवले. राॅक ऑन व्हील स्केटिंग अॅकॅडमी कात्रज,कोचर ,विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा क्लास सुरू झाला आणि येथूनच जणू नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची शृंखला सुरू झाली.
तिने विविध छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ‘लॉन्ग रेस’ आणि ‘शॉर्ट रेस’मधील आपले सुवर्णपदक पटकावले आणि येथून जणू तिने पदके जिंकण्याचा धडाकाच लावला. नंतर स्केटिंग कारकीर्द 1वर्षात 8सुवर्णपदक,4रोप्यपदक,व4 कांस्यपदकासह 4रेकाॅर्ड पदक 2रजत चषकाची कमाई केली आहे.नुकत्याच बेळगाव येथे पार पडलेल्या सलग 75तास रिले स्केटिंग तसेच 100मीटर बॅकवर्ड स्केटिंग अंतर 14सेकंद .84मायक्रो सेकंदात पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे.यापुर्वी एसिया पॅसिफिक रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड ,व एकस्ट्रीम रेकॉर्ड मिळवले आहेत, तसेच ज्युनियर साय॔टीस्ट हा शालेय पुरस्कार देखील मिळाला आहे. शांभवी ने अनेक पदकांवर आपले नाव तर कोरलेच आहे, पण त्यासोबतच नवनवे विक्रम आपल्या नावे करून ती स्वतः सोबतच परिवार आणि शाळेचे नावदेखील मोठे करत आहे.
शांभवीची आजवरची कामगिरी ही प्रेरणादायी आहे. शांभवीने आजवर ज्या ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्या त्या स्पर्धांमध्येक तिने सुवर्णपदक मिळवले आहे. तिचे यश सोन्यासारखे चकाकणारे आहे. तिच्या पुढे उज्ज्वल भविष्यकाळ आहे. आपल्या अथक प्रयत्नांतून शांभवी अजूनही मोठी भरारी घेईल आणि जगभरात आपले नाव उज्ज्वल करेल, यात शंकाच नाही. शांभवीच्या सुवर्णमयी यशासाठी तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्वर्णिम वाटचालीसाठी योगाचार्य दीपक महाराज शिळीमकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .