खा. अमोल कोल्हे, खा. वंदना चव्हाण यांची उपस्थिती
पुणे ,
हडपसर विधानसभा महा विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, खासदार वंदना चव्हाण व डॉ.अमोल कोल्हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना नेते वसंत मोरे, ऍड.जयदेव गायकवाड, बंडूतात्या गायकवाड, शहराध्यक्ष अंकुश काकडे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, प्रविण तुपे, वंदना मोडक, सुनील जगताप, विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, पूजा कोद्रे, शमशुद्दीन इनामदार, प्रशांत सुरसे, आदि सह कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वानवडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हडपसर मधील मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रशांत जगताप यांनी कन्यादान मंगल कार्यालय पासून पायी रॅली काढत विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रशांत जगताप यांच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला,
शरद पवार साहेबांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला असून हा समाजात चांगला मेसेज आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात येथील विकास कामे झाली नाही तसेच नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हडपसर मध्ये परिवर्तन घडवणार जनता माझ्या पाठीशी उभा राहणार असा विश्वास उमेदवार प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशांत जगताप यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणावे असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केला.