Thursday, May 15, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीसहज- सोपे डिजिटल मार्केटिंग’ पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी

सहज- सोपे डिजिटल मार्केटिंग’ पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी

अनिल चौधरी, पुणे,

पहिल्या मराठी डिजिटल मार्केटिंग पुस्तकाचे ‘सहज- सोपे डिजिटल मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात ‘AI च्या बटव्यातून’ या बहुचर्चित पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन आणि जनरेटिव्ह AI च्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या २०२५ च्या अभिनव कॅलेंडरचे अनावरणदेखील होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक श्री. अच्युत गोडबोले, मुख्य मार्गदर्शक एमकेसीएल डॉ. विवेक सावंत, न्युफ्लेक्सचे संचालक डॉ. भूषण केळकर, आणि विलोचे उपाध्यक्ष व एसबीयू प्रमुख डॉ. रवींद्र उटगीकर उपस्थित राहणार आहेत.

नवनाथ जगताप यांचे रुद्र एंटरप्रायझेस प्रकाशित ‘सहज- सोपे डिजिटल मार्केटिंग’ हे मराठीतील पहिले डिजिटल मार्केटिंगवरील पुस्तक आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून फ्रीलान्सर्स, उद्योजक आणि गृहिणींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असून डिजिटल मार्केटिंगमधील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून देते. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला सुहासिनी किर्लोस्कर (प्रसिद्ध मार्केटिंग सल्लागार), माधुरा बाचल (डिजिटल जगतात प्रथमच महाराष्ट्रीयन पदार्थ सादर करणाऱ्या प्रभावी व्यक्ती), क्षितिज पटवर्धन (भारतीय पटकथा लेखक आणि नाट्यदिग्दर्शक) आणि इंद्रनील चितळे (मॅनेजिंग पार्टनर,चितळे बंधूं) यांच्याकडून खूप प्रशंसा मिळाली आहे.

‘AI च्या बटव्यातून’ पुस्तकाची चौथी आवृत्ती:
फक्त सात महिन्यांत लोकप्रिय ठरलेल्या ‘AI च्या बटव्यातून’ या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित होत आहे. ४८ श्रेणींमधील १८० AI टूल्सची माहिती देणारे हे पुस्तक विद्यार्थी, उद्योजक, ग्राफिक डिझायनर, शेअर बाजार तज्ज्ञ, व्हिडिओ एडिटर्स यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या पुस्तकाला पद्मभूषण डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, आणि पद्मश्री संजय धांडे यांनी हे पुस्तक गौरवलेले आहे.

२०२५ च्या कॅलेंडरविषयी:
जनरेटिव्ह AI चा उपयोग करून तयार करण्यात आलेले हे कॅलेंडर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींना भारतीय शैलीमध्ये सादर करते. हे कॅलेंडर कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम संगम आहे.

डॉ. अमेय पांगारकर हे आंतरराष्ट्रीय TEDx वक्ते, मार्केटिंग सल्लागार, AI तज्ज्ञ आणि परफॉर्मन्स-बेस्ड डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ आहेत. प्रसाद कुलकर्णी हे Google Ads तज्ज्ञ असून,, AI तज्ञ आणि डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!