अनिल चौधरी, पुणे
पुणे शहर पोलिसदलातील शिपाई हर्षल शिवरकर यांच्या प्रसंगवधानाने एका युवतीला जीवनदान मिळाले असून हर्षल शिवरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे शहरातील वानवडी येथील होले वस्ती येथे एका दुचाकीवरून जाणाऱ्या युवतीला फिट येऊन रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावर पडली. तेथे जवळच पोलीस शिपाई हे होते त्यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार व प्रथमोचार नुसार तातडीने युवतीला मदत केली. त्यानंतर फिट येऊन बेशुद्ध असलेली युवती काही वेळात शुद्धीवर आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवरकर यांनी त्वरित युवतीच्या भावास फोन करून बोलावून घेऊन त्याच्या सोबत घरी सुखरूप पोहोचवले. होले वस्ती परिसरात राहणारे पोलीस शिपाई यांचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस हेच जनतेचे सेवक असेही नागरिक यावेळी म्हणत आहेत.