Homeताज्या घडामोडी‘अंबर तारा’तर्फे साड्यांचे ‘जय हो’ विशेष कलेक्शन सादर

‘अंबर तारा’तर्फे साड्यांचे ‘जय हो’ विशेष कलेक्शन सादर

अनिल चौधरी, पुणे, 

नमिता काळभोर यांनी स्थापन केलेल्या व परंपरा व अभिनवता यांचा संगम साधणाऱ्या ‘अंबर तारा’ या प्रसिध्द भारतीय डिझायनर लेबलतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथे ‘जय हो’ साड्यांचे खास कलेक्शन सादर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनासाठीचा हा खास संग्रह अभिजातता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या डिझायनर साड्यांच्या अप्रतिम श्रेणींद्वारे भारताच्या सांस्कृतिक वारसा आणि समकालीन भावनेला आदरांजली अर्पण करतो.

या कलेक्शनमध्ये भारताचा अभिमान आणि एकात्मता दर्शवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या सुझानी फ्लोरल तिरंगा साडी, तिरंगा साडी आणि मारीगोल्ड तिरंगा साडी अशा तीन उत्कृष्ट साड्यांचा समावेश आहे. बारीक डिझाईन, कलाकुसर आणि तिरंग्याच्या रंगछटांचे परिपूर्ण मिलाफ असलेले ‘जय हो’ कलेक्शन भारताचे गुणवैशिष्ट्य अचूक प्रतित करतेच, परंतु आधुनिक पिढीशी तादात्म्यही साधते.

या कलेक्शनबाबत अधिक माहिती देताना ‘अंबर तारा’च्या संस्थापक व डिझायनर नमिता काळभोर म्हणाल्या की, हे ‘जय हो’ कलेक्शन भारताच्या परंपरेला अर्पण केलेल्या आदरांजलींहून खूप काही अधिक असून जागरूक आणि सशक्त भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. अंबर तारा येथे आमच्या डिझाईनच्या प्रत्येक रचनांच्या पैलूला प्रेरणा देणाऱ्या महिलांचे सामर्थ्य आणि सर्जनशीलता साजरी करतो. फॅशन आणि संस्कृतीसाठी उद्याच्या उज्वल भविष्याची कल्पना करताना हे कलेक्शन भारताच्या उत्साहपूर्ण भावनेचा सन्मान करणारे आहे.

जय हो सुझनानी फ्लोरल ट्रायकलर साडी ही भारताच्या भावनेप्रती आदरांजली अर्पण करणारी आहे. शांतता आणि विकास दर्शविणारा या साडीचा पोत आणि प्रतीकात्मक रंगांसह भारताच्या उत्कृष्टतेचा नमुना प्रतिबिंबित करते.

लग्न समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर समारंभांसाठी अनुरूप ही साडी परंपरा आणि आधुनिक अभिजातता यांचा मिलाफ आहे.हा प्रजासत्ताक दिन ‘अंबर तारा’च्या कलेक्शनसह साजरा करूयात भारताचा वारसा. अधिक माहितीसाठी <https://ambartaara.com> या संकेतस्थळाला भेट द्या किंवा <https://www.instagram.com/ambar_taara/> या पेजला फॉलो करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments