जागतिक महिला दिन विशेष
मराठी मुलीची उत्तुंग यशोगाथा
अनिल चौधरी, पुणे
एखाद्या स्त्रीने एखादे संशोधन हातात घेऊन स्टार्टअप कंपनी उभारण्याचा विचार करावा तेही लग्न झाल्यानंतर मुले आणि संसार सांभाळून आपली कल्पना मूर्त स्वरूपात आणावी तीही कल्पना अशी की जगातले पहिले केवळ 80 सेकंदामध्ये गरम पाण्यात विरघळणारे सॅनिटरी पॅड ची निर्मिती आणि हे करून दाखवले आहे पुण्यात राहणाऱ्या सारिका पाठक कुलकर्णी यांनी . पाण्यात विरघळणारे सॅनिटरी पॅड आणि त्याचे सहजगत्या विघटन करणारे यंत्र असे दोन्ही पेटंट त्यांच्या नावावर आहेत
आज मितिला संपूर्ण जगभर एक अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे सॅनिटरी पॅडचे विघटन. हा विषय अत्यंत गंभीर असून त्यावर आजपर्यंत कोणालाही उपाय सुचलेला नाही. आज जिकडे जाल तिकडे रस्त्यावर, नाल्यांमध्ये, कचराकुंडीमध्ये गटारांमध्ये, शेतात, मातीत सॅनिटरी पॅडचे ढीगच्या ढीग पडलेले दिसतात. आणि एक सॅनिटरी पॅडचे विघटन होण्यासाठी 800 वर्षे लागतात. कारण सॅनिटरी पॅड हे प्लास्टिक पासून बनवलेले असतात. शिवाय ठीक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड ची विल्हेवाट लावण्यासाठी आग यंत्र बसवले आहे मात्र त्याच्यामध्ये सॅनेटरी नॅपकिन टाकल्यास पर्यावरणाला घातक असा धूर तयार होतो आणि हीच गंभीर समस्या. आणि याच गंभीर समस्येवरती संशोधन करूण्यासाठी परदेशात जाऊन फिलाडेल्फिया युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये मास्टर करत सॅनिटरी नॅपकिन या विषयावर प्रोजेक्ट व संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली. आणि त्यातूनच गरम पाण्यात सहज विघटित होईल असे सॅनिटरी पॅडचे केवळ 80 सेकंदामध्ये गरम पाण्यात विरघळणारे सॅनिटरी पॅडची निर्माण, निर्मिती करण्यात आली.
सारिका पाठक यांच्या संशोधनावर प्रभावित होऊन जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीने सारिकासह या शोधाचे जागतिक पेटंट रजिस्टर केले आणि ते अनेक देशात ग्रँड देखील झाले आहे. मुळात सॅनिटरी पॅडचे विघटन होणे आणि पर्यावरणाला हानिकारकता न पोहोचवता याचबरोबर स्त्रियांना सहजपणे वापर करता येईल आणि सॅनिटरी पॅड ची प्रायव्हसीही जपणे सहज शक्य होईल
आणि याच विचारातून क्रेसा ग्रीन टेक या कंपनीचा उदय झाला. क्रेसाची संकल्पना मुळी क्रिएटिव्ह सॅनिटेशन अशी आहे. 2021 मध्ये मनात आलेली कल्पना म्हणजे विघटन होणारे सॅनिटरी नॅपकिन आणि त्याच्या विघटनासाठी लागणारे यंत्र असे दोन विषयाचे तात्पुरते पेटंट रजिस्टर पेटंट स्टॅनफोर्ड सीड प्रोग्राम या ठिकाणी सारीकाने आपल्या संशोधन नाचा पेपर सादर केला असता जगातील 181 देशांमधून आलेल्या स्पर्धकांमधून सारिकाने तिसरे स्थान पटकाविले.या कार्यासाठी आर्थिक फंड यासाठी सारिका ने अनेक परीक्षा आणि मुलाखती दिल्या आवश्यक ती आर्थिक मदत सीओईपी भाऊ इंक्युबेशन सेंटर तर्फे आपले गुणवत्ता दाखवून स्वबळावर मिळवली. व संशोधन पुढे चालू ठेवले सारिका ज्या कॉलेजमध्ये शिकत होती ते एमआयटी कॉलेज यांनी तिच्या विचारांची संशोधनाची दखल घेऊन उत्तम मार्गदर्शन केले आणि पाठिंबा दिला.
या सर्व कष्टाचे फळ म्हणजे 2024 मध्ये सॅनिटरी नॅपकिन विघटन करण्याचे यंत्र याचे पेटंट सारीकाला मिळाले तसेच 2025 मध्ये म्हणजे याच वर्षाच्या सुरुवातीला वाटर डिझायलेबल सॅनिटरी नॅपकिन याचे देखील पेटंट ग्रँड झाले. क्रेसाच्या सॅनिटरी नॅपकिन चे वैशिष्ट्य हे आहे की हे नॅपकिन गरम पाण्यात सहज विघटित होते सध्याच्या सांडपाणी मधून ते सहज वाहून जाते स्त्रियांना वापरण्यास सोयीचे आणि सुखाचे शिवाय प्रदूषण आणि आरोग्यास हानिकारक समस्यापासून दूर होण्यास हे दोन्हीही उपक्रम सक्षम आहेत असा सारिकाचा विश्वास आहे. या दोन पेटंट्स मुळे प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन याला पर्याय म्हणून भविष्यात देशात आणि जगात नैसर्गिक संतुलन साधणारे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देऊन जगभर भेडसविणाऱ्या सॅनेटरी नॅपकिनचा विघटन विल्हेवाट तसेच पर्यावरणाला भेडसावणाऱ्या प्रदूषण आरोग्यास हानिकारक यापासून सुटका मिळावी असे सारिका पाठक कुलकर्णी यांचे ध्येय आहे . त्यांचे कार्य संपूर्ण जगभर जगात नाव लौकीक मिळवणारे आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख आणि यातुन महिलांमध्ये जिद्द निर्माण व्हावी.