Homeताज्या घडामोडीमृणाल चा आशा द मॅजिक संगीत शो ३०मार्चला पुण्यात

मृणाल चा आशा द मॅजिक संगीत शो ३०मार्चला पुण्यात

अनिल चौधरी, पुणे

मृणाल रणधीर एक युवा गायिका वयाच्या दहा वर्षांपासून गायन करत आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने गायनाला सुरुवात करून तिने यशाचे शिखर आता गाठले आहे . आपल्या सुमुधुर गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ पाडत असून देश विदेशात तिचे गायनाचे शो आता फुल होत असून तिला आता थोडीही उसंत मिळत नाही. संपूर्ण भारतातील मृणालचे शो फुल होत असून तिच्या गायनाला प्रचंड मागणी आहे. नुकताच तिने इंग्लंड येथे शो केला असून पुन्हा पुढील महिन्यात पुन्हा इंग्लंड ला शो असल्याचे तिने सांगितले.

पुणे हि जन्मभूमी असल्याने पुण्यात एखादा मोठा शो करण्याचे वडिलांचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी तिने ” आशा द मॅजिक ” या म्युझिकल शोचे बालगंर्धव रंगमंदीर येथे ३० मार्च रोजी रात्री नऊ वाजता शोचे आयोजन केले आहे. आशा भोसले यांनी गायिलेले सर्व गाणी ती यावेळी गाणार आहे. तिच्या सोबतीला किशोर कुमार यांचा आवाज असलेले ऑर्केस्ट्रा स्टार जितेंद्र भुरूक हे तिला साद देणार असल्याचे तिचे वडील उन्मेष रणधीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments