जनसेवा हीच ईश्वरसेवा; अक्षय शिंदे
कोंढवा प्रतिनिधी ,
वाढत्या लोकसंख्येबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि कोंढवा भागातील अनेक नागरिक सार्वजनिक वाहतुक बसेसचा वापर करतात त्यांना कोंढवा ते डेक्कन आणि बावधान तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नाही. याबाबतची तक्रार काही नागरिकांनी भाजपा युवा नेते अक्षय शिंदे यांच्याकडे केली. त्यांनी त्वरित आपले मार्गदर्शक आ. योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम पी एल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कोंढवा ते डेक्कन अशी नवीन बससेवा सुरु करण्यासाठी निवेदन दिले. प्रशासनाने निवेदनाची त्वरित दखल घेऊन कोंढवा ते डेक्कन अशी बससेवा रविवारी आ.योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह भ प पंढरीनाथ लोणकर , मदन शिंदे , भाऊ पारगे, तानाजी लोणकर ,अमर गव्हाणे तसेच कोंढवा ग्रामस्थ्यांच्या हस्ते बससेवेचा प्रारंभ करण्यात आला .
यावेळी बोलताना अक्षय शिंदे म्हणाले कि, कोंढवा भागातून पुणे शहरातील मध्यवर्ती भाग, तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिक बसेसचा वापर करतात. परंतु शहरातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी एकच बस उपलब्ध नाही त्यांना एका ठिकाणी उतरून दुसरी बस करावी लागते . त्यामुळे आम्ही यापुढे सर्व शहरातील ठिकाणी जाण्यासाठी देखील एकच बस डायरेक्ट उपलब्ध करून देणार आहोत यामुळे नागरिकांना , शाळेतील मुलांना , वयोवृद्ध , अपंग, महिला यांना या बससेवेचा लाभ होईल. तरच जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानली जाईल असेही अक्षय शिंदे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी नाना पारगे, सुदाम वांजळे. गणेश लोणकर , प्रशांत लोणकर, दादासाहेब लोणकर, प्रवीण जगताप, लक्ष्मण लोणकर, दत्ता पोकळे, नारायण लोणकर, बबन लोणकर, काका पांगारे, लक्ष्मण ननावरे, दत्ता लोणकर, राजेंद्र वाघ तसेच कोंढवा खुर्द ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.




