अनिल चौधरी, पुणे
दरवर्षी स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा संस्थेच्या जेष्ठ व्यापारी सभासदांना जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.
या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना संस्थेच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ,देऊन सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री सभागृह” येथे आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये सन्मानित करण्यात येईल.अशी माहिती संस्थेचे सचिव किशोर पिरगळ यांनी दिली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी,उपाध्यक्ष संजय राठी,सचिव किशोर पिरगळ यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.



