पुणे : IIT बॉम्बेचे माजी विद्यार्थी वैभव बाकलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) या संस्थेने आपला २० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. JEE Main आणि Advanced या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून BT ने महाराष्ट्रातील अग्रगण्य कोचिंग संस्था म्हणून स्थान निर्माण केले आहे.
गेल्या दोन दशकांत BT कडून ४,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून सात वेळा सिंगल डिजिट AIR, पाच महाराष्ट्र टॉपर्स आणि दहा पुणे टॉपर्स घडवले आहेत. २०२५ मधील JEE Main मध्ये BT च्या आयुष चौधरीने अखिल भारतीय ७ वा क्रमांक मिळवला, तर ३७८ विद्यार्थी JEE Advanced साठी पात्र ठरले. मागील वर्षी BT चे १२ विद्यार्थी JEE Advanced टॉप ५०० मध्ये होते, जे पुण्यातील इतर सर्व संस्थांच्या तुलनेत अधिक आहे.
या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर BT ची वार्षिक कोडी परीक्षा स्पर्धा Whizz-Kid 2025 ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. दोन फेऱ्यांच्या या स्पर्धेत पहिली फेरी १२ ऑक्टोबर रोजी BT च्या विविध केंद्रांवर होणार आहे. अंतिम फेरीतून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. टॉप १० विजेत्यांना ₹१५,००० ते ₹२,००० दरम्यानचे Amazon गिफ्ट व्हाउचर्स, तर टॉप ५० विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि गिफ्ट्स देण्यात येणार असल्याची माहिती बाकलीवाल ट्युटोरियल्सतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या ऑपरेशन्सचे प्रमुख सानिध्य झवर, माधव बापट, निखिल भटनागर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
Whizz-Kid ही स्पर्धा गेल्या दोन दशकांपासून विद्यार्थ्यांना तार्किक विचार, विश्लेषणशक्ती आणि सर्जनशीलतेकडे प्रवृत्त करत आहे. या स्पर्धेत विचारलेली काही कोडी नंतर RMO, Technothlon सारख्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील समाविष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले.
BT च्या वतीने सांगण्यात आले की, “हा २० वर्षांचा टप्पा हा केवळ यशाचा उत्सव नसून पुढील वाटचालीचा प्रारंभ आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या यश या तीन स्तंभांवर संस्थेची बांधिलकी कायम राहील.”
Whizz-Kid 2025 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
www.bakliwaltutorialsiit.com/



