पुणे प्रतिनिधी
RLSS या संस्थेने पुणे महानगरपालिकेच्या 24 स्विमिंग पूलचे ऑडिट करून सुरक्षे संदर्भात केलेल्या कामाचे कौतुक वाटत असून या महत्त्वाच्या कार्यासाठी त्यांना आपल्या वतीने कायम सहकार्य करण्याचे आश्वासन नगरसेवक साहिल केदारी यांनी दिले.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जलतरण तलावांवरील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी
राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी इंडिया यांच्या वतीने वानवडीतील पालिकेच्या कै बापूसाहेब केदारी जलतरण तलाव येथे ‘पूल सेफ्टी वर्कशॉप २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी नगरसेवक साहिल केदारी, RLSS चे कमोडोर अरविंद शर्मा, ब्रिगेडियर पुरुषोत्तम शर्मा, केदारी जलतरण तलाव व्यवस्थापक तेजबहादूर भगत, पुणे शहरातील जलतरण तलावाचे व्यवस्थापक, लाईफ गार्डस, प्रशिक्षक व देखभाल दुरुस्ती विभाग कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीच्या उपाध्यक्षा कविता शर्मा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



