Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeक्रीडाचेन्नई चॅलेंजर्सचा तेलुगू बुल्सवर 51-29 असा विजय

चेन्नई चॅलेंजर्सचा तेलुगू बुल्सवर 51-29 असा विजय

मल्हार न्यूज (ऑनलाईन) प्रनील, मल्लिनाथ गुरवे  पुणे,

 सुनील कुमार (19 गुण), इलायाराजा (10 गुण) यांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग  स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स संघाने तेलुगू बुल्ससंघाला 51-29  असे पराभूत केले.चेन्नईकडून बचावफळीत धनराज बी. ने पाच आणि मोफीमोंडलने तीन गुण मिळवत विजयात आपले योगदान दिले.तेलुगू बुल्स संघाला दोन्ही सामन्यातपराभूत व्हावे लागल्याने ते गुणतालिकेत झोन बी मध्ये तळाशी पोहोचले आहेत तर, एक विजय व एक पराभव यासंह चेन्नईचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.        पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या सामन्यात चेन्नई चॅलेंजर्स संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला.चेन्नईकडून कर्णधार सुनील कुमारने आक्रमक खेळ करतचेन्नईला 17- 5  अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाच्या बचवफळीने चांगला खेळ करत संघाच्या गुणसंख्येत भर घातली.दुसरीकडे सुनील कुमारसोबतइलायाराजाने गुण मिळवत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले व संघाला मध्यंतरापर्यंत 28-13 अशी आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नईने 11- 8               अशी बाजी मारली. पहिल्यासत्रात तेलुगू बुल्सच्या चढाईपटूंना फारशी चमक दाखवता आली नाही.     तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नईच्या संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवला.चेन्नईच्या सुनील कुमारने आपला आक्रमक  खेळ सुरूच ठेवत संघासाठी गुणांची कमाई केली.त्याला पुन्हा एकदाइलायाराजाची चांगली साथ मिळाली.त्यामुळे तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील चेन्नई संघाने 16-8  अशी आघाडी कायम ठेवली.चेन्नईचा बचावफळीने देखील चांगला खेळ दाखवला.तेलुगूसंघाकडून प्रयत्न झाले पण, तोवर उशीर झाला होता. चेन्नई संघाने हा सामना 51-29 असा आपल्या नावे केला. शेवटच्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने 8-7 अशी आघाडी घेतली पण, ती पुरेशीठरली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!