दोंडाईचा-चिमठाणे परिसरात वाळू माफियाचा धुमाकूळ

992

बातमी छापण्यावरून पत्रकाराला जिवे  मारण्याची धमकी

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

चिमठाणे येथील एका दैनिकाचे प्रतिनिधी प्रवीण भोई यांना वाळू माफिया कडून मारहाण व जीवेठार मारून टाकण्याची धमकी/चिमठाणे दलवाडे पिंपरी या ठिकाणी बुराई नदी असून गेल्या अनेक दिवसांपासून वाळू बंदीचा आदेश जारी करण्यात आला होता असून परंतु जशी पाहिजे तशी कुठे ही वाळू बंदी दिसत नाही शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परीसरात अनेक मोठ्या कार्यवाही करण्यात आल्या पण आता चक्क भर दिवसा वाळूची खुलेआम प्रशासनासमोरच वाळूची चोरी करतांना वाळूचे ट्रॅकटर चालू असून याकडे संबंधित शिंदखेडा महसूल विभागाने अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून चिमठाणे नदीत मोठ्या प्रमाणावर भोई समाजाच्या डांगर मळ्याची जागा असून त्यावर भोई समाज उदरनिर्वाह चालवतो परंतु यावर प्रशासन कधीही विचार करत नसल्याचे चित्र स्पष्टपणे जाहीर झाले आहे चिमठाणे,खलाने, निशाण या गावात देखील अजून कोणत्याही प्रकारचा अधिकारी आला नाही याला जबाबदार कोण? व ह्या सरकारी मालमत्तेवर वाळू माफिया किंग झाले आणि पैसा देऊन अधिकारी विकत घेण्याची धमकी देखील जाते म्हणजे प्रशासनाला जर वाळूमाफिया विकत घेत असेल तर वाळू माफिया किंग झाला आणि अधिकारी हप्ते वर विकले जातात हे सिद्ध झाले आहे ना कुणाचा डर ना कुणाची भीती अशी परिस्थिती चिमठाणे परिसरात सध्या पाहायला मिळते गावातील नागरिकानी अनेक वेळा तक्रारी करून यावर कार्यवाही शून्य दिसते मग जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी अन्यथा भोई समजा तीव्र आंदोलन करेल यांची जबाबदारी प्रशासनची राहील अशी गव्ही चिमठाणे परिसरात केली जाते चिमठाणे परीसरात या अगोदर देखील लाखों रुपयांचा दंड वसूल करण्यात होता परंतु त्या नंतर मात्र कार्यवाही कुठे ही करण्यात आली नाही यामुळे वाळू माफियाची दादागिरी ही जोरात सुरू असून तहसीलदार व तलाठी मंडळ अधिकारी व महसूल विभागाने याकडे लक्ष दिले नाही येणाऱ्या काळात खुप मोठे संकट उभे राहिल अशी माहिती चिमठाणे परिसरातून मिळताना दिसत आहे कारण वचक नावाची गोष्ट कुठे ही दिसत नाही व जिल्हा अधिकारी यांना देखील आपण गाबरत नसल्याने वाळू माफिया कडून बोलले जाते मग या पेक्षा अजून कोना मोठा हा एक प्रश्न निर्माण झाला आहे भविष्यात वाळूमाफिया या लोकांना गावात येऊन मारतील अशी परिस्थिती नको यायला म्हणून चिमठाणे परिसरातील अधिकारिंनि यावर निरबंध घालने गरजेचे आहे अन्यथा चिमठाणे परीसरात घातपात होण्याची भीती व्यक्त केली जाते तसेच शिंदखेडा तालुक्यातील अधिकारीकडून अध्यप कुठेलिही कार्यवाही केली नाही वाळू माफिया हा मोकाट असून या वर कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा अन्य काही दाखल करण्यात नसून याबाबत शिंदखेडा तालुक्यातून या चर्चेला उधाण आले आहे.