सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कोळी यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

837

शैलेंद्र चौधरी

अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत धुळे येथील राजश्री शाहू नाट्य मंदिरात सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कोळी यांना समाजरत्न पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला देवेंद्र कोळी यांनी ऊसतोड कामगार मेंढपाळ तसेच वीट काम करणाऱ्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत आत्तापर्यत त्यांनी जवळ जवळ 35 जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल 36500 वह्यांचे व इतर शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे तसेच आत्तापर्यत वाढदिवस लग्न समारंभ तसेच इतर समारंभ मध्ये जवळ जवळ 28000 रोपांचे वाटप व त्यांचे संगोपन केले आहे तसेच स्वतःच्या लग्नात आहेर म्हणून प्रत्येकाला रोपं भेट देऊ केली आहेत.

तसेच मिशन चिल्ड्रन स्माईल अंतर्गत गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावे यासाठी फूटपाथवरील तसेच इतर रस्त्यावरील अनाथ मुलांना खाऊ कपडे तसेच इतर वस्तू देऊ करतात तरुण मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतात तसेच राज्यस्तरीय मरेथॉन स्पर्धेचे आयोजन करतात.