शिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

1360

शैलेंद्र चौधरी 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीसाठी 2 कोटी 74 लाखाचा निधी ग्रामविकास विभागाकडून मंजूर झाला होता त्यातून पंचायत समितीच्या मालकीच्या 1 हेक्टर 78 आर क्षेत्रात ही भव्य वास्तू उभरण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वानमती सी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे,कामराज निकम,अनिल वानखेडे,नरेंद्र गिरासे,सर्जेराव पाटील,विश्वनाथ पाटील,रघुवीर बागल,विक्रम पाटील, तहसीलदार सुदाम महाजन, साहेबराव सोनवणे,माजी सभापती जिजाब राव सोनवणे, नथा पाटील,सहा गटविकास अधिकारी वळवी,उपअभियंता संजय बागुल,गटशिक्षणाधिकारी एफ के गायकवाड,कार्यलय अधीक्षक विजयसिंह गिरासे, आर के गिरासे,योगेश गिरासे, ठेकेदार यशवंत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना ना.रावल म्हणले की,शिंदखेडा तालुक्याला पूर्वी कायमस्वरूपी दुष्काळी असा कलंक लागला होता की सतत दुष्काळ पडल्याने कितीही विहिरी खोदल्या बोअरवेल केल्या तरी देखील पाणी लागत नव्हते,पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार,आणि इतर माध्यमातून बंधारे,नाला खोलीकरण अशी विविध कामे केली होती याशिवाय बुराई नदीवर माथा ते पायथा बंधारे बांधून ठेवले होतें आज जोरदार असा पाऊस पडल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी प्रकल्प,अमरावती प्रकल्प,तापी वरील बॅरेज असे चहुबाजूंनी पाणीच पाणी असलायने आपला सिचन सह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पुढील काळात सुलवाडे जामफळ,आणि प्रकाशा बुराई उपसा योजनेचे काम देखील सुरू असून येत्या 2 ते 3 वर्षात शिंदखेडा मतदारसंघात दुष्काळ हा शब्द देखील निघणार नाही एवढी कामे करून देखील पाऊस नसल्याने आम्हाला चिंता वाटत होती परंतु आमच्या कुलदेवता असलेल्या आशापुरी आणि पेडकाई मातेच्या मंदिराला देखील आम्ही निधी देऊन चांगल्या पावसासाठी साकडे घातले होते अखेर वरुण राजाने देखील कृपा करून आमच्या तालुक्यातील सर्वच प्रकल्प आणि बंधारे पूर्ण भरल्यामुळे विरोधकांना धडकी भरली असून विकासाच्या मुद्यावर कोणताही मुद्दा आता त्याच्याकडे नाही म्हणून ते जातीय विष पेरून तालुक्याचे वातावरण खराब करतील त्याना तिथेच धडा शिकवावा असे आवाहन करत पुढच्या पिढीला आता दुष्काळ हा शब्द देखील माहिती पडू देणार नाही असे प्रतिपादन केले.