साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या मुलाला आणि त्याच्या सहकाऱ्याना मारहाण

904

महेश फलटणकर, उरुळी कांचन

पुणे- सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर शनिवारी (ता. १४ ) रात्री आठ वाजन्याच्या सुमारास हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणास लोखंडी रॉड, टॉमी, कंबरेच्या पट्टयाने दहा  ते पंधरा जणांनी मारहाण केल्याची घटना घडली.   

     या घटनेत पृथ्वीराज राजेंद्र नागवडे (वय – २५, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा, जी. अहमदनगर ) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे व इतर पाच ते सहाजणावर पृथ्वीराज नागवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

     पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पृथ्वीराज नागवडे व त्यांचे दोन मित्र योगेश भोईटे (रा. सांगवी, ता, श्रीगोंदा जि. अहमदनगर ) व मनीष जाधव (रा. दौंड, ता. दौंड जि. पुणे ) हे संध्याकाळी कोरेगाव पार्क येथे दोन चारचाकी गाड्या घेऊन श्रीगोंदाकडे चालले होते. रात्री आठ वाजण्याचा पुणे सोलापूर महामार्गावरील मांजरी ग्रीन येथील भारत पेट्रोल पंपाशेजारी आले असता डिव्हायडरमधून पुण्याकडे जाण्यासाठी टु व्हिलर  अचानक आडवे आल्याने  ब्रेक मारून हॉर्न वाजवला. त्यावेळी चालक बाजूची काच खाली घेतली असता दुचाकीवरील निलेश दिवेकर व त्याचे वडील (नाव व पत्ता पूर्ण माहिती नाही ) दोघे हॉर्न का वाजवला म्हणून शिवीगाळ व मारहाण करू लागले. गाडीच्या पाठीमागे दुसर्‍या गाडीमध्ये असणारे योगेश भोईटे व मनीष जाधव हे भांडणे सोडवुन नागवडे यांना समाजावुन सांगुन गाडीत बसण्याची विनंती केली.मात्र निलेश दिवेकर यांने आमच्या परिसरात येऊन आम्हाला रडतोस असे म्हणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.  नागवडे व दिवेकर यांच्यातील वाद पाहुन स्थानिक नागरिक जमा होऊ लागल्याने नागवडे आपल्या वाहनात बसुन लोणी काळभोर बाजुकडे वेगात निघुन जाऊ लागले. त्याचवेळी दिवेकर याने आपल्या काही मित्रांच्या साह्याने नागवडे यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली नागवडे यांची गाडी कवडी पाट टोल नाक्याजवळ आडवुन सात ते आठ दुचाकीवरुन आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या जमावाने नागवडे यांची चारचाकी फोडायला सुरवात करुन तसेच हातातील लोखंडी रॉड, पट्टे व लाकडी दांड्याच्या साह्याने नागवडे यांना बेदम मारहाण केली. तर मारहाण सोडविण्यासाठी आलेल्या योगेश भोईटे व मनिष जाधव या दोघांनाही दिवेकर व त्याच्या मित्रांनी धक्काबुक्की केली. 

    दरम्यान ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच पोलीस उपनिरिक्षक शिवाजी ननवरे व त्याचे सहकारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी नागवडे व त्याच्या मित्रांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता दिवेकर व त्याच्या सहकार्यानी पोलिसांनाही आरेरावी करण्याचा प्रयत्न केला. रात्री नागवडे यांच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी निलेश दिवेकर व त्याच्या सहकार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.