नंदुरबार विधानसभा मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम

834

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान विषयक माहिती देण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
येत्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्याबरोबरच ईव्हीएमद्वारे मतदानाची माहिती देण्यात येत आहे नंदुरबार तालुक्यातील तराडी,वाघोदा,औरंगपूर, ठाणेपाडा येथे मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती देण्यात आली आणि मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे 17 सप्टेंबर 2019 पासून दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका एमएच-39 एजी-0001 ते 9999 सुरू होणार आहे. वाहनधारकांना दुचाकी वाहनांकरीता आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असल्यास त्यांनी 16 सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्याच्या धर्तीवर अर्जदारास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल एका क्रमांकासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलावाद्वारे तो नोंदणी क्रमांक बहाल करण्यात येईल,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी कळविले आहे.
—–
[9/13, 20:08] Shailendra Choudhari: दि 16 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी सोमवार दि 16 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील रंगावली सभागृहात जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला लोकशाही दिनात, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे,न्याय प्रविष्ठ प्रकरणे,सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,रुम नं.226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड,नंदुरबार यांच्या कार्यालयात(दुरध्वनी क्र.02564-210047)साधावा. जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0
दुधाळ गट, शेळी गट व कुक्कुट गटासाठी लाभार्थ्यांची निवड

सन 2019-20 या आर्थिक वर्षात नाविन्यपुर्ण योजना दुधाळ,शेळी,कुक्कुट गट यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली132 लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने अंतिम लाभार्थी निवड करण्यात आली आहे या लाभार्थ्यांना 4 दुधाळ गटासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान रुपये 80 हजार व अनूसुचित जाती/जमाती साठी 75 टक्के अनूदान रूपये 1 लाख 20 हजार प्राप्त होवू शकेल. शेळीगटासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान रूपये 43 हजार 929 व अनूसुचित जाती/जमातीसाठी 75 टक्के अनुदान रूपये 65 हजार 89,तर कुक्कूट पालनासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान रूपये 1 लाख 12 हजार 500 व अनूसुचित जाती/जमाती साठी 75 टक्के अनुदान रूपये 1 लाख 68 हजार 750 अनूदान प्राप्त होणार आहे या अंतिम निवड झालेल्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन,नंदुरबार यांच्याकडून देण्यात येत आहेत.
0 0 0 0 0 0 0 0
अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना संगणक प्रशिक्षण

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यक्षेत्रातील तळोदा,अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील युवक-युवतींना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष केंद्रीय सहाय्य योजने
अंतर्गत आयोजित या प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज दि 16 सप्टेंबरपर्यंत शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही ती योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मि आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी केले आहे.